शबरीमाला मंदिर प्रवेश आंदोलन, पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड
शबरीमाला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केरळमध्ये अभुतपूर्प परिस्थिती निर्माण.
निलाक्कल, केरळ : शबरीमाला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केरळमध्ये अभुतपूर्प परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांच्या प्रवेशाच्यावेळी राडा पाहायला मिळाला. महिला पत्रकांरांवर हल्ला करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी दगफेकीच्या घटना घडला. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पार्किंग केलेल्या गाड्यांवर पोलिसांनी विनाकारण हल्ला चढवला. अनेक गाड्यांचे नुकसान केले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ज्या महिला मंदिर प्रवेशासाठी येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कॅमेरे बंद करण्यासाठी पत्रकारांवरही दबाव आणला जात आहे. महिला पत्रकारांवर आंदोलक राग काढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसिद्ध शबरीमला मंदिराचे दरवाजे आज सायंकाळी महिलांसाठी प्रथमच उघडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर तणाव स्थिती निर्माण झाल्याने शबरीमला मंदिरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या निल्लाकल, पंबा आणि सन्निधनम भागात १ हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
जे कोणी वाहतूक अडवून आंदोलन करत आहेत; त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. मात्र, जे भाविक मंदिराकडे जात आहे त्यांना थांबविले जात नसल्याचे केरळ पोलिस प्रमुखांनी म्हटले आहे. १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशबंदी असणारी शेकडो वर्षांची प्रथा बंद केल्याच्या निर्णयाला केरळमध्ये प्रचंड विरोध सुरू आहे. महिलांना मंदिरात प्रवेश न देण्यासाठी काही संघटना आणि पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.
तर दुसरीकडे शबरीमला प्रश्नी आरएसएस आणि भाजपची भूमिका दुटप्पी आहे. एकाबाजूने भाजपशी संबंधित चार वकिलांनी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसऱ्या बाजूने भाजप न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी पुढाकार घेत आहे. आता हा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री व्ही एस सुनील यांनी व्यक्त करताना भाजपवर टीका केली.