Shraddha Murder Case: मेरा अब्दुल ऐसा नही..., श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral
Ketki Chitale नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
मुंबई : आपल्या संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) अनेक खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिचा मोबाइल हा महाराष्ट्रात फेकून दिला. त्याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच श्रद्धा वालकरचा (Shraddha Walker) खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडर (Laxman Nadar) यानं जुलैमध्ये श्रद्धाशी बोलणं झालं असं सांगितलं. या सगळ्यामुळे श्रद्धाचा खून हा नेमका कधी झाला असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. हे भयंकर कृत्य आफताबनं चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये पाहून केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला असता, अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketki Chitale) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे.
श्रद्धाच्या हत्याकांडावर काय म्हणाली केतकी चितळे
केतकीनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केली आहे. 'मेरा अबदुल ऐसा नही. बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण 35 तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा ( यावेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात? #जागो मेरे देश', असे केतकी म्हणाली. (Ketki Chitale Instagram Post)
सनातन मुलांना उद्देशून पुढे केतकी म्हणाली...
केतकीनं तिच्या पुढे तिच्या स्टोरीमध्ये पोस्टमध्ये म्हटले की, 'सनातनी मुलांनो, तुम्हालाही सुधारण्याची गरज आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या पोकळ पुरुषार्थावर प्रेम करत राहाल तोवर मुली अबदुल, आफताब, अहमदबरोबर दिसणार. कारण मुलींना पटवण्याबरोबर ते मुलींना अटेंशन देतात, मग मर्डर करतात. तुम्ही मुलींना आधी नाकारता आणि तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करता'.
श्रद्धाच्या मृतदेहाचे 12 तुकडे सापडले
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत 12 तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे.
हेही वाचा : Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, श्रद्धा हत्याप्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबनं श्रद्धाचा खून करण्याआधी अशा प्रकारे हत्या करणाऱ्या वेब सीरिज पाहिल्या होत्या. डेस्कर ही अमेरिकी सीरिज त्यानं पाहिली होती.