नवी दिल्ली : भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीवर अनेक संत होवून गेले. त्यांनी दिलेली शिकवण त्यांचे विचार आणि संस्कृती आजही भारतात कायम आहे. आजच्या घडीला प्रत्येक सणाचं औचित्य साधत संतांच्या पादुकांची पूजा-अर्चा केली जाते. भक्तांच्या मनात आपल्या देवाच्या पादुकांचं असलेलं अनन्यसाधारण आहे. सांगायचं झालं तर वनवासात असलेल्या रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून ज्याप्रमाणे भरताने राज्य केले. तेव्हापासून ते आतापर्यंत श्री रामांच्या पादुकांचं पुजन केलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता त्याच देवाच्या पादुका भक्तांच्य थेट घरी पोहोचणार आहेत. अयोध्यामधील मोहम्मद आझम यांचा लाकडी पादुका निर्माण करण्याचा व्यवसाय आहे. भारतात देवाच्या पादुका आणि त्यांच्या वस्त्रांची पूजा करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे येत्या काळात ते तयार करत असलेल्या पादुकांना चांगली मागणी येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 



मोहम्मद आझम म्हणाले की, 'असंख्य लोक देवांच्या पादुका आणि वस्त्रांची पूजा करतात, त्यामुळे अयोध्येत राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी भक्तांची गर्दी वाढेल. त्यामुळे पादुकांची मागणीही वाढेल शिवाय माझा एक सहकारी सुद्धा हिंदू आहे.आम्ही एकत्र काम करतो आणि उत्सव साजरा करतो. असं ते म्हणाले. 


दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. अयोध्येतील भूमिपूजनाचा हा सोहळा भव्य करण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.