नवी दिल्ली : प्लॅस्टिकच्या वापराविरोधात संपूर्ण देशभरात अभियान सुरु आहे. २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले. प्लॅस्टिकच्या वापराने होणाऱ्या नुकसानाबाबत लोकांना जागरुक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आता बांबूपासून बॉटल्स तयार करण्यात आल्या आहेत. बांबूच्या या बॉटल खादी ग्रामोद्योग आयोगने (Khadi and Village Industries Commission) तयार केल्या आहेत. बांबूच्या बॉटल प्लॅस्टिक बाटल्यांच्या जागी वापरल्या जाऊ शकतात. खादीच्या दुकानात या बॉटल्सची विक्री सुरु करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रिय रस्ते-वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बांबूच्या बॉटल्स लॉन्च केल्या. या बॉटल्स ७५० एमएल आणि १०० लीटरपर्यंत आहेत. या बॉटल्स किंमत ३०० रुपयांपासून सुरु होते. एक लीटर बॉटलची किंमत ५६० रुपये इतकी आहे.


खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉटल बनवण्यासाठी त्रिपुरातील जंगलातील बांबूंचा वापर करण्यात येत आहे. या बॉटल खराब होणार नाहीत. या बॉटलमधील पाणीही नैसर्गिक राहील. बांबूच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी गुणकारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.


 


खादी  ग्रामोद्योग आयोगने, मातीचे कुल्हडही (kulhad) बनवण्यास सुरुवात केली आहे. १ कोटीहून अधिक मातीचे कुल्हड तयार असल्याची माहिती मिळत आहे.


खादी ग्रामोद्योगाच्या पुढाकाराने, मातीचे कुल्हड आणि बांबूच्या बॉटल्स तयार करण्यात येत असल्याने या भागातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. या योजनेमध्ये अनेक लोक सामिल होत असल्याची माहिती मिळत आहे.