कार कंपनी किया इंडियाने नवी स्किम आणली आहे. त्याची विशेषतः अशी आहे की, जर ग्राहकाला कंपनीची कार पसंत पडली नाही तर तो कार 30 दिवसांच्या आत परत देऊ शकतो. त्याबदल्यात कंपनी 95 टक्के रक्कम परत देणार आहे. ही ऑफर फक्त प्रीमियम एमपीवी कार्निवलवर असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किया इंडियाचे म्हणणे आहे की, कार्निवल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या समाधानाची गँरेटी देणारी ही योजना आहे. यामध्ये ही सुविधा आहे की, जर खरेदीनंतर तुम्हाला कार आवडली नाही. तर एक महिना चालवल्यानंतर कंपनीला परत करू शकता. 95 टक्के रक्कम, नोंदणी फी, फायनान्सवर झालेला खर्च एवढी रक्कम कंपनी तुम्हाला परत करणार आहे.


Kia Carnival ग्राहकांना याकडे लक्ष द्यावे


या ऑफरमध्ये कियाचे नेमके अटी शर्थी काय आहेत. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांनी कार्निवल खरेदी केल्यानंतर 1500 किमी पेक्षा जास्त फिरायला नको. कारवर कोणतेही डॅमेज नको, कारवर कोणत्याही प्रकारचे लोन असता कामा नये 


ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आली कार्निवल


किया कार्निवलला गेल्यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते. ही एमपीवी, 7,8,9 सिटिंग तीन वेगवेगळ्या लेआऊंट्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये 2.2 लीटरच्या क्षमतेचे डीजेल इंजिनचा प्रयोग केला आहे. एका वर्षात कंपनीची 6 हजार 200 हून अधिक कार विकल्या गेल्या आहेत.