`गोरक्षणाच्या नावाखालचा हिंसाचार मान्य नाही`
साबरमती आश्रमाच्या शताब्दी वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अहिंसेचा संदेश दिलाय.
साबरमती : साबरमती आश्रमाच्या शताब्दी वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अहिंसेचा संदेश दिलाय. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणं, कायदा हातात घेणं हे मंजूर नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना सुनावलंय.
हिंसेमुळे कोणतेच प्रश्न सुटले नाही आणि सुटणार नाहीत असंही पंतप्रधान म्हणालेत. महात्मा गांधींना हे मान्य नव्हते आणि गांधींजींच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहनही मोदींनी केलंय.
यावेळी आपल्या बालपणीची आठवण सांगताना मोदी भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपनं गुजरात निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं बोललं जातंय. संध्याकाळी होणा-या मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे.