उत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं
उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
सोल : उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
थिंक टँक युरोपियन कमिशन ऑफ फॉरेन रिलेशन (ECFR) च्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या हिट लिस्टमध्ये अमेरिकेच्या व्हाईट हाऊस, पेंटागॉन, सरकारी इमारत, मॅनहॅटन, गुआम, सैन्य तळ आणि न्यूक्लिअर एअरक्राफ्ट कॅरिअर आहे.
तसंच जपानच्या क्योटो, तोक्यो, ओसाका, योकोहामा, नागोया यांसहीत १५ शहरांच्या नावांचा समावेश आहे.
गुरुवारी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात केलेल्या उल्लेखानुसार, प्योंगयांग गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकन शहरं आणि एशिया-पॅसिफिक क्षेत्रात वॉशिंग्टच्या अड्ड्यांवर हल्ल्याची धमकी देत आहे. तर उत्तर कोरियन मीडियानंही प्योंगयांगची सेना अमेरिका आणि पॅसिफिक क्षेत्रात असलेल्या सैन्य तळांवर कोणत्याही क्षणी हल्ल्यासाठी सज्ज असल्याची वावडी उठवलीय.