मुंबई : बऱ्याचदा आपल्या घरातील दुध खराब झालं की काहीजण त्याला फेकुन देतात. तर काही लोकं त्या खराब दुधाचं पनीर किंवा खवा बनवतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की खराब दुधाचं नुसतं पनीर किंवा खवा नाही तर त्याबदल्यात आणखी काही गोष्टी देखील तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही काय काय बनवु शकता त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिकन मॅरीनेशन : खूप कमी लोक चिकन मॅरीनेशनमध्ये दह्याचा वापर करतात. खास गोष्ट म्हणजे जर तुम्हाला घरी नॉनव्हेज बनवण्याचा शौक असेल तर दुधात मॅरीनेट करून चिकनची चव तुम्ही दुप्पट करु शकता.


घट्ट दही : जर तुम्हालाही बाजारासारखे घट्ट दही घरी बनवायचे असेल, तर फाटलेल्या दुधापासून घरीच दही बनवा. खराब झालेल्या दुधात थोडे दही घाला आणि काही तासांनंतर तुमचे घट्ट दही तयार होईल.


केक बनवा : केकमध्ये दही केलेले दूध वापरल्याने ते केक जास्त फुगतो. वास्तविक, फाटलेले दूध बेकिंग सोडा म्हणून काम करते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर अंड्यांऐवजी फाटलेल्या दुधाने केक बनवू शकता.


कलाकंद : मिठाईच्या दुकानात दही दुधापासून कलाकंदसारखी चवदार मिठाई बनवली जाते. जर तुम्हीही घरी बनवण्याचा विचार करत असाल तर ते बनवु शकता. ती चांगले चवदार बनेल.


फाटलेल्या दुधाचे पाणी : बहुतेक लोक फाटलेल्या दुधाचे पाणी फेकून देतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की याच्या पाण्यात भरपूर प्रोटीन असते. त्याचे पाणी आजच आपल्या आहाराचा भाग बनवा आणि आपले शरीर निरोगी ठेवा.