Cleaning hacks : स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी तवा (chapati making) हवाच...रोज रोज वापरल्याने तवा काळा पडू लागतो, त्यानंतर तो साफ करणं खूप कठीण होऊन बसत. त्यामुळे आज खास टिप्स मध्ये अश्या प्रकारे काळा पडलेला तवा कश्याप्रकारे स्वच्छ कराल तेही अवघ्या काहीच मिनिटात! आणि तो चमकेल नव्या सारखा...आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच पैसे खर्च  करण्याची गरज नाही. (kitchen tips how to clean dirty black pan like new one)  


किचन टिप्स (kitchen tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा अश्या काही किचन टिप्स असतात ज्या आपल्याला माहितीसुद्धा नसतात पण त्या अगदी सोप्या आणि कामाच्या असतात. ज्या वापरून आपण स्मार्ट गृहिणी बनू शकता.


घरातच आहेत उपाय


काळा पडलेला तवा स्वच्छ करण्यासाठी तुमच्या किचन मध्येच (kitchen hacks) काही अश्या गोष्टी आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता, आपल्या दररोजच्या वापरातल्या काही गोष्टी वापरून जाणून घेऊया कश्या प्रकारे तवा चमकवू  शकतो.
व्हिनेगर (vinegar)


चांदीप्रमाणे तवा चमकवायचा आहे तर व्हिनेगर तुम्हाला खूप मदत करेल, सर्वात आधी तवा गॅसवर उलट गॅस चालू करा तवा चांगला  त्याच्या वर व्हिनेगर घाला आणि स्क्रबर च्या मदतीने घासून घ्या अवघ्या काही सेकंदातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.  (cleaning hacks)


बेकिंग सोडा (baking soda) 


बेकिंग सोडच्या मदतीने  आपण तव्याला नव्यासारखा चमकवू शकता. यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घाला त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या. असं केल्याने तव्यावरिल काळपटपणा दूर व्हायला मदत होईल.


याशिवाय स्वयंपाक करताना, काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तवा काळा पडणार  नाही


चपाती बनवण्याचा तवा हा फक्त चपात्यांसाठीच वापरावा त्यात भाजी किंवा इतर पदार्थ गरम करू नयेत.


तव्याचा वापर करून झाल्यावर तो नेहमी पुसून ठेवावा, नुसता धुवून ओला तसाच ठेवला तर  त्यावर गंज चढतो, आणि हळूहळू खराब होतो. आणि खराब झालेल्या तव्यावर चपात्या चिकटतात आणि खराब होतात.


त्यामुळे वरील काही टिप्स वापरून तवा स्वच्छ करा आणि तुमच्याकडेही काही हटके टिप्स असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा.