Grinder Blades: आज प्रत्येक घरात मिक्सर ग्राइंडरशिवाय काम करणे शक्य नाही. घरातील महिला आज कामावर जायला लागली आहे. मग अशावेळी घरातील कामामध्ये तिची साथ मिक्सर ग्राइंडर देत असतो. चटणी बनवण्यापासून ते चपातीसाठी आटा मिक्स करण्यापासून ही महिला मिक्सरचा वापर करते. मग अशात जर तुमची किचनमधील साथी मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड खराब झाले तर...मग होते तुमची धावपळ. अशावेळी तुम्ही शेजारी कोणातरी कडून काही वेळासाठी मिक्सर आणता आणि आपली कामं पूर्ण करता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता काळजी करायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचं मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड धार धार राहतील. (kitchen tips to sharpen grinder blades with sandpaper in marathi)


सॅण्ड पेपर 


हो, अगदी बरोबर सॅण्ड पेपरने तुम्ही मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडला धारधार बनवू शकतात. तुमच्या परिसरातील कुठल्याही हार्डवेअर स्टोअरमध्ये सॅण्ड पेपर सहज मिळतात. त्याशिवाय खूप कमी किंमतीत तुम्ही मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडला धार देऊ शकतात. 



कसा करणार सॅण्ड पेपरचा वापर?


सगळ्यात पहिले मिक्सर ग्राइंडरच्या भांड्याचे ब्लेड बाहेर काढा. त्यानंतर हे ब्लेड चांगले स्वच्छ धुवून घ्या. आता तुम्ही आणलेल्या सॅण्ड पेपरचा एक तुकडा घ्या. या पेपरच्या तुकड्याने ब्लेड जवळपास 10 ते 15 मिनिटे घासून घ्या. आता हे ब्लेड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर हे ब्लेड किचनच्या स्लॅपवर हलकाने घासा. बघा तुमच्या मिक्सर गाइंडरचे ब्लेड धारदार झाले असेल. 


या गोष्टींची विशेष काळजी घ्या 


1. ब्लेडला धार धारदार करताना दक्षता घ्या अन्यथा तुमचा हात कापू शकतो. 


2. ब्लेडला धार करताना हातात हातमोजे घाला. त्यामुळे तुम्हाला दुखापत होणार नाही. 


वर्षानुवर्ष मिक्सर टिकण्यासाठी या गोष्टी करा


1. ओव्हर लोडींग करु नका


2. सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून फिरवू नका


3. गरम पदार्थ मिक्सरमधून फिरवू नका


4. चुकीच्या ब्लेड्सचा वापर चुकीच्या पदार्थासाठी करु नका


5. मिक्सर सुरु करण्यापूर्वी भांड्याचं झाकण व्यवस्थित बंद करा.