नवी दिल्ली : आता बातमी तुमच्या कामाची. खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवरचा खर्च आता आवाक्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया आता काही हजार रुपयांत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडघेदुखीनं बेजार असलेल्यांना या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेचा मार्ग डॉक्टरांकडून सुचवला जातो. मात्र या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयं तब्बल ४ ते ५ लाख रुपये आकारतात. त्यामुळे सामान्य रग्णांना ही शस्त्रक्रिया करुन घेणं अशक्य होतं. 


रुग्णांची ही लूटमार थांबवण्यासाठी राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणानं पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गुडघे प्रत्यारोपणाच्या यंत्रसामुग्रीच्या किमती तब्बल ४ ते ३९ हजारांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. या नव्या किमती रुग्णालयं, वितरक तसंच उत्पादक यांना तातडीनं बंधनकारक करण्यात आल्या आहेत.