सोन्या-चांदीचे दर इतक्या रुपयांनी वाढले, जाणून घ्या !
जाणून घ्या आजचे दर
नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या किंमती (Gold and Silver Rate) कालच्या तुलनेत वाढलेल्या पाहायला मिळतायत. सोन्यातली गुंतवणूक ही भविष्य काळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे महागाई असली तरी सोन्या चांदीच्या दर पाहून शक्य होईल तशी खरेदी केली जाते. काल परवापर्यंत स्थिर दिसणाऱ्या सोन्या चांदीच्या किंमतीनी आज उसळी घेतली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
परवा (17 March 2021) रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price) प्रति 10 ग्रॅम 44 हजार 150 इतकी होती. काल त्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. आज ही किंमत प्रति 10 ग्रॅमला 44 हजार 350 इतकी आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत काल 48 हजार 160 इतकी होती. ही किंमत आज 48 हजार 380 इतकी झाली आहे.
चांदीच्या (Today Silver Price) बाबतीत बोलायचं झालं तर 1 किलोग्रॅम चांदीचा दर परवा (17 March 2021) 67 हजार 600 इतका होता. काल हा दर 600 रुपयांनी कमी झाला आहे. काल 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 67 हजार इतकी होती. आज ही किंमत 67 हजार 700 इतकी पोहोचली आहे.