मुंबई : सोन्याने 37 हजारचा आकडा पार केला आहे. आजही सोने प्रति तोळा 500 ते 700 वाढले आहे आणि हे भाव पुढील काही दिवसात असेल वाढतील. अमेरिकेच्या आणि दक्षिण कोरियाच्या मधील वाद सोने वाढीसाठी कारणीभूत आहे मात्र याचा परिणाम सोने खरेदीवर होणार नाही असे मत व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सोने ३८ हजारच्या घरात पोहोचले. देशाची राजधानी दिल्लीमध्ये याची किंमत १ हजार ११३ रुपयांनी वाढली. सोन्याचा आजचा भाव ३७ हजार ९२० रुपये आहे. पहिल्यांदाच सोन्याचा भाव इतक्या स्तरावर पोहोचल्याचे तज्ञ सांगत आहेत. ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 


चांदीच्या दरामध्ये ६५० रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचा दर ४३ हजार ६७० रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे. 



सोमवारी सोना चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत होती. पण सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १६३ रुपयांनी घसरून ३६ हजार ८०७ रुपये झाले. ज्वेलर्सतर्फे सोन्याची मागणी नसल्याने किंमतीत घट झाल्याचे मत ऑल इंडीया सराफा बाजारातून व्यक्त करण्यात आले होते.