क्रेडिट कार्ड यूजर्संना मिळणारे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या
ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना कायमच क्रेडीट कार्डचं आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे क्रेडीट जवळ असायला हवं असं काही जणांना वाटतं.
Credit Card Users: ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना कायमच क्रेडीट कार्डचं आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे क्रेडीट जवळ असायला हवं असं काही जणांना वाटतं. त्यामुळे अनेक जण क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. क्रेडीट कार्ड खर्च व्यवस्थापित करण्याचा उत्तम मार्ग आहे. क्रेडीट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केल्यास एक उत्तम मालमत्ता ठरू शकते. जर तुम्ही देखील क्रेडीट कार्डचे वापरकर्ते असाल तर तुम्हाला त्याचे फायदे माहिती असणं गरजेचं आहे. क्रेडीट कार्डचे नेमके फायदे काय आहेत? जाणून घेऊयात
ई-कॉमर्सवर अनेक फायदे उपलब्ध आहेत
जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करणं पसंत असेल, तर क्रेडीट कार्ड तुमच्या फायद्याचं आहे. काही ई-कॉमर्स वेबसाइट्स तुम्हाला काही बँकांच्या कार्डवर ऑफर देतात. त्यांचा वापर करून तुम्ही चांगली विशेष सवलत मिळवू शकता. पेमेंट करण्यापूर्वी या सवलती एकदा पाहून घ्या. जर तुमची बँक सूचीबद्ध सवलतीच्या यादीत असेल, तर या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
एक्स्ट्रा रिवॉर्ड
अनेक क्रेडिट कार्डे तुम्हाला मर्चेंट सूट देखील देतात. तुम्ही जितके जास्त स्वाइप कराल तितके जास्त रिवॉर्ड तुम्हाला मिळतील. पेट्रोल आणि इंधन भरतानाही तुम्हाला क्रेडिट कार्डवर वेगळे रिवॉर्ड्स दिले जातात. तुम्ही हे कॅशबॅक पॉइंट रिडीम करू शकता.
आता खरेदी करा नंतर पैसे भरा
अनेक क्रेडीट कार्डे तुम्हाला Buy Now Pay Later चा पर्याय देतात. या पर्यायाच्या मदतीने तुम्ही 0% व्याजदराने खरेदी केल्यानंतर क्रेडिट कार्डची रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये पभरू शकता.
इतर फायदे
अनेक कंपन्या आणि प्रसिद्ध ब्रँड्सच्या ऑफर क्रेडिट कार्डशी जोडल्या जातात. याद्वारे, तुम्ही प्रसिद्ध ब्रँड्सवरील सूट ऑफरचा लाभ घेऊ शकता. EMI घेऊन तुम्हाला व्याजमुक्त कर्ज देखील मिळते.