Indian Railway: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीच्या लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण विचार करतो की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. पण, या रेल्वेसाठी जे रुळांचं जाळं पसरलेलं आहे ते बनवण्यासाठी किती खर्च लागतो हे तुम्हाला महित आहे का? जाणून घ्या एक किलोमीटर एवढा रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठीचा खर्च.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे प्रणाली आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. देशभरात रेल्वे नेटवर्क वेगाने विस्तारीत होत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रेल्वे ट्रॅक (पटरी) टाकण्यासाठी किती खर्च येतो? हा खर्च तुम्ही विचार करु शकणार नाही एवढा जास्त असतो.


भारतीय रेल्वे नेटवर्क


भारतात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या भारतीय रेल्वे दररोज सुमारे 13,000 गाड्या चालवते आणि त्याद्वारे लाखो प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वे ही देशातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांची संस्था आहे. देशातील बहुतांश भाग रेल्वेच्या माध्यमातूनच जोडले गेले आहेत.


भारतात एकूण रेल्वे मार्गाची लांबी 1 लाख 26 हजार 366 किलोमीटर आहे, त्यापैकी रनिंग ट्रॅक 99 हजार 235 किमी लांब आहे. देशभरात 8 हजार 800 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक रेल्वे मार्ग असलेले राज्य असून, तिथे 9 लक्ष 7 हजार 745 किमी लांब रेल्वे मार्ग आहे.


एक किलोमीटर रेल्वे पटरी टाकण्यासाठी किती खर्च येतो?


रेल्वे ट्रॅक टाकण्याचा खर्च तो ज्या भागात टाकला जातो त्यावर अवलंबून असतो. माळरान आणि समतल भागात एक किलोमीटर रेल्वे पटरी टाकण्यासाठी सुमारे 10 ते 12 कोटी रुपये खर्च येतो. मात्र, डोंगराळ आणि अवघड भागांमध्ये हा खर्च जास्त होतो.
जर आपण हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (जसे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प) बघितला, तर त्यासाठी एक किलोमीटर पटरी टाकण्याचा खर्च 100 ते 140 कोटी रुपये पर्यंत होतो. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, पूल आणि अन्य सुविधा यांचा समावेश असतो.


हे ही वाचा: भारतात 'या' राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला तर हजारोंच्या दंडासहीत होते कारावासाची शिक्षा 


भारतीय रेल्वे सतत रेल्वेचे जाळे विस्तारत आहे आणि नव्या प्रकल्पांवर भर देत आहे. काळांतराने आणखी वेगवान आणि आधुनिक रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे भारतातील प्रवासी अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद रेल्वे प्रवासाचा आनंद घेऊ शकतील