मुंबई : आपल्यापैकी अनेकांना सरकारी लालफितीचा कारभाराचा अनुभव आला असेल. सरकारच्या या गलथानपणाच्या काराभारामुळे सामान्यांना दररोजची कामं सोडून कार्यालयात येजा करावी लागते. त्यानंतरही काम होत नाही.  याची तक्रार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे केली जाते. मात्र या अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. अशा वेळेस वैतागलेला प्रत्येक जण याबाबतची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला पंतप्रधानक कार्यालयाकडून न्याय मिळेल, असा आशावाद असतो. पण पीएमओ कार्यालयापर्यंत तक्रार करण्यासाठी काय करावं लागतं, याबाबतची माहिती आपल्यापैकी अनेकांना नसते. या अज्ञानामुळे अनेक जण शांत राहतात. पीएमओ कार्यालयापर्यंत  ऑनलाईन तक्रार कशी करायची, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रार कशी करायची?  


तक्रार नोंदवण्यासाठी पीएमओ ऑफिसच्या वेबसाइट https://www.pmindia.gov.in/hi या वेबसाईटवर लॉगीन करावं लागेल.  यानंतर पंतप्रधानांशी संवाद (ड्रॉप डाऊन मेन्यू) पंतप्रधानांना लिहा या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर कोणतीही तक्रार करता येते.  


यानंतर  CPGRAMS नवं पेज ओपन होईल. येथे तक्रार नोंदवता येते. या तक्रारीसह पुरावा म्हणून तुम्हाला दस्तऐवजही जोडता येतात. यामध्ये आवश्यक तसेच तक्रारदाराची वैयक्तिक माहिती विचारली जाते.  तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होतो.  


पत्राद्वारेही तक्रार


सर्वांनाच ऑनलाईन तक्रार करणं शक्य असतंच असं नाही. त्यामुळे पत्राद्वारेही तुमची तक्रार पीएमओपर्यंत पोहचवू शकता. यासाठी तुम्हाला  प्रधान मंत्री कार्यालय, साउथ ब्लॉक, नई दिल्ली, पिन – 110011 या पत्त्यावर पत्र पोस्ट करावं लागेल किंवा  011-23016857 या क्रमांकावर फॅक्स करावं लागेल. 


कारवाई कशी केली जाते?


पीएमओकडे दररोज असंख्य प्रमाणात तक्रारी केल्या जातात. या तक्रारी विविध राज्यातून विविध विभागासंदर्भात केलेल्या असतात. लोकांकडून आलेल्या तक्रारीचं निरसण करण्यासाठी पीएमओमध्ये स्वंतंत्र विभाग असतो. त्या विभागाकडून यावर काम केलं जातं. त्यानुसार प्रत्येकाच्या तक्रारीला (CPGRAMS) च्या माध्यामातून तक्रारकर्त्याला उत्तर दिलं जातं. 


संबंधित बातम्या :


तुमचं पॅनकार्ड हरवलंय; तर 'या' 12 स्टेप्सने मिळवा परत