नवऱ्याची मैत्रिणींशी वाढतेय जवळीक? मनातील संशय असा दूर करा, जाणून घ्या
मत्सर मर्यादेपलीकडे गेली तर ती समस्या बनू शकते.
Husband Female Friends: सध्याच्या पिढीमध्ये रिलेशनशिपला घेऊन अनेक ताणतणाव असतात. कधी कधी हे ताणतणाव वाढत जातात आणि रिलेशनशिपमध्ये भांडणं होयलाही फार वेळ लागत नाही. कधी कधी या तणावाचे मुळ काय हेही कळत नाही अशावेळी काय करावे हेसुद्धा अनेक कपल्सना कळत नाही तेव्हा अशावेळी एक गोष्ट असते जी नात्यात नेहमीच अडथळा निर्माण करत असते आणि ती म्हणजे संशय.
सध्याच्या काळात मुला-मुलींमध्ये मैत्रीचा फार कॉमन झाली आहे म्हणजे लग्नानंतरही पतीची जवळची मैत्रीण असते किंवा पत्नीचा जवळचा मैत्रही. त्या दोघांमध्ये केवळ मैत्री असते पण आपल्या पार्टनरला मात्र गोष्टी मैत्रीच्याही पुढे गेल्या आहेत की काय याचा सारखा संशय येऊ लागतो. अर्थात तो मानवी स्वभाव आहे. ,
पण अनेकदा असे दिसून येते की पत्नी आपल्या पतीच्या जवळच्या मैत्रिणीकडे संशयाने पाहतात त्यांना मैत्री पलीकडेही त्यांचे नाते पुढे सरकले आहे की काय असा संशय येयला लागतो. या भावनेमुळे तिच्या मनात असुरक्षितही वाटू लागते आणि कदाचित यामुळे त्यांच्या नात्यामध्ये कटूतेचेही भाव निर्माण होऊ शकतात.
पण चिंता करू नका यामागील कारणं समजून घेतील कर तुम्ही तुमचा संशय नक्कीच दूर करू शकता.
बायकोला शंका का येतो?
सहसा अनेक बायका आपल्या पतीबद्दल खूप Passesive असतात. त्यांना असे नेहमी वाटतं राहतं की पतीच्या कुठल्याही मैत्रीणीने त्याच्या हृदयात स्थान निर्माण करू नये. त्या गोष्टीची भिती तिच्या मनात सतत राहत असते. तिला असं वाटतं राहतं की कदाचित मैत्रीच्या पुढे गोष्टी सरकल्या आहेत आणि अशी भावना निर्माण झाली की नवरा आपल्याला वेळ देत नाहीये याची खात्रीही तिला वाटू शकते.
शंका कशी दूर करावी?
सहसा पतीच्या मैत्रिणी जुन्या शाळा-कॉलेज किंवा सध्याच्या कामाच्या ठिकाणच्या असू शकतात. जर तुमच्या मनात शंका निर्माण होऊ लागली तर ती दूर करण्यासाठी तुमच्या पतीच्या मैत्रिणीशी मैत्री करा. तुम्ही जर असे केलेत तर तुम्हाला तुमच्या पतीची त्या व्यक्तीशी असलेली मैत्री नीट समजून घेता येईल. त्यांची मैत्री कशी आहे याचाही प्रत्यय तुम्हाला येईल आणि तुमच्या शंकाही दूर होतील. आजकाल ऑफिसमध्ये ग्रुप पार्ट्या, टीम लंच आणि टीम डिनर अनेक वेळा एकत्र केले जातात ज्यामध्ये महिलांचाही सहभाग असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांना याबाबतीत थोडं बदलावं लागेल.
संवाद ठेवा.
स्त्रिया जेव्हा आपल्या पतीवर संशय घेतात तेव्हा त्या आपला तणाव नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसोबत शेअर करतात परंतु ही पद्धत योग्य नाही कारण काहीवेळा आपल्या ओळखीचे लोक प्रकरण शांत करण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचेही काम करू शकतात. तुम्ही तुमची समस्या पतीला सांगा आणि त्यांच्यात फक्त मैत्रीचे नाते आहे की नाही हे स्पष्ट करणे अधिक योग्य ठरेल.
मत्सर मर्यादेपलीकडे गेली तर ती समस्या बनू शकते. म्हणून शंका घेणे व्यर्थ आहे कारण ही ईर्ष्या ही तुमचे नाते तोडू शकते.