नाकाच्या आकारावरून ओळखू शकता एखाद्याचं व्यक्तिमत्व, कसं ते जाणून घ्या
द जर्नल ऑफ क्रॅनिओफेशियल सर्जरीच्या 2013 च्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नाकाचा आकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते.
मुंबई : असं म्हणतात की, व्यक्तीचा चेहरा किंवा त्याचं वागणं हे त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीबद्दल खूप काही सांगून जातो. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा दुसऱ्याच्या चेहऱ्यापेक्षा वेगळा असतो हे तर तुम्हाला माहितच आहे. परंतु तुम्ही कधी कोणाच्या नाकावरुन त्याचा स्वभाव किंवा त्याच्या पर्सनॅलिटीबद्दल अंदाजा लावला आहे? हो हे खरं आहे की, नाकाचा आकार तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बऱ्यात गोष्टी सांगतो. आता तुमच्या मनात देखील हे जाणून घेण्याची इच्छा झाली असेल की, नाकावरुन पर्सनॅलिटी कशी ओळखायची. हो ना? चला तर मग हे जाणून घेऊ.
द जर्नल ऑफ क्रॅनिओफेशियल सर्जरीच्या 2013 च्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नाकाचा आकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते. या अभ्यासासाठी, संशोधकांनी वेगवेगळ्या लोकांच्या नाकांच्या सुमारे 1700 चित्रांचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळले की वेगवेगळ्या आकाराच्या नाकांचे व्यक्तिमत्व हे वेगळे असते. त्यात नाकाची रचना समान असलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये समानता आढळली.
लांब नाक
या अभ्यासानुसार ज्यांचे नाक लांब असते, त्यांना मेहनती मानले जाते. अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवडते. हे लोक त्यांच्या व्यावसायिक आयुष्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्त महत्व देतात.
लहान नाक
अभ्यासानुसार, ज्या लोकांचे नाक लहान असते, ते संवेदनशील असतात. लोकांच्या भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. असे लोक करिअरच्या आधी कुटुंब ठेवतात.
टोकदार नाक
ज्या लोकांचे नाक टोकदार असते ते आर्थिक सल्ला देण्यात चांगले असतात. या लोकांना त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन कसे करावे हे चांगले माहित आहे.
सरळ ग्रीक नाक
ज्या लोकांचे नाक सरळ असते, असे लोक बुद्धिमान असतात. असे लोक विश्वासार्ह असतात.
बटण नाक
अशा प्रकारचे नाक असलेले लोक खूप काळजी घेणारे असतात. हे लोक वाईट परिस्थितीत सकारात्मक राहतात आणि असे लोक खूप भावनिक असतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)