`या` Tax Savings Schemes मध्ये तुम्ही करू शकता गुंतवणूक! पाहा किती मिळेल कर सवलत
Tax Saving Schemes: टॅक्स हा आपल्याला भरणं अनिवार्यचं असते परंतु अशाही काही स्किम्स आहेत. ज्यातून तुम्ही गुंतवणूक (Tax Saving on Investment) करताना तुमचा कर वाचवू शकता. तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदाही करून घेता येतो तेव्हा हे जाणून घ्या की तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या योजनांतून (Tax Saving Schemes in Marathi) कर वाचवू शकता?
Tax Saving Schemes: सध्या महागाई बेसुमार वाढत असून अशावेळी आता आपल्याला योग्य त्या गुंतवणूकींच्या पर्यांयाचा (Investment Options) विचार करणे आवश्यक आहे. त्यातून कोणतीही गुंतवणूक करायची म्हटली तरी आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे यातून कर चुकवण्याचा. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात या ना त्या गोष्टींतून कर चुकवतच असतो. त्यामुळे आपल्याला कुठेतरी टॅक्स सेव्हिंग हवी असते.
त्यातून अशाही काही गुतंवणूक योजना आहेत जिथे तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला टॅक्सही (Tax Benefit) भरावा लागणार नाही आणि तुम्हाला कर सवलत मिळेल. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की अशा कोणत्या गव्हर्मेंट स्किम्स आहे ज्यातून तुम्हाला सहज करावर सूट मिळू शकते. तुम्हाला या योजनांचा चांगलाच फायदा होऊ शकतो.
अशा काही स्किम्स आहे ज्यात तुम्ही योग्य प्रकारे गुंतवणूक करू शकता आणि त्यातून तुम्हाला भरपूर चांगले रिटर्न्स मिळतील आणि ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. यावर तुम्हालाही कर सवलत मिळेल. या काही पाच स्किम्स आहेत ज्यातून तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. गुंतवणूक करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी (Tax Saving Schemes in India) घ्यावी लागते त्यातून तुम्हाला योग्य ती गुंतवणूक स्ट्रेटेजीही ठरवावी लागते ज्याचा फायदा तुम्हाला लॉन्ग टर्म गुंतवणूकीसाठी अचूक करता येतो.
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट
ही एक लोकप्रिय योजना आहे यातून तुम्हाला चांगला फायदा होतो. मुळात याचा अवधी हा 5 वर्षांचा आहे आणि तुम्हाला सेक्शन 80C नुसार या योजनेतून टॅक्स सवलत मिळते. यातून तुम्हाला चांगले रिटर्न्सही (Returns) मिळतात. तुम्ही यातून साधारणपणे 1000 रूपयांपासून गुंतवणूक करू शकता. तेव्हा तुम्हाला यातून 7 टक्क्यांचा परतावा मिळेल.
युएलआयपी प्लान
यातूनही तुम्हाला टॅक्स सवलत मिळेल. सेक्शन 10(10D) नुसार मॅच्यूरिटीवर टॅक्स सवलत (Maturity) मिळते. त्यातून सेक्शन 80C प्रमाणे तुम्हाला यातून योग्य ती कर सवलत मिळेल. यावर तुम्हाला चांगला परतावाही मिळेल.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड
नोकरदारवर्गांना या फंडबद्दल माहिती असेलच. या फंडमधून तुम्हाला योग्य ती सवलत मिळेल. तुम्ही 500 रूपयांची गुंतवणूक करू शकता. त्यातून या फंडचा मेच्यूरिटी पिरियड हा 15 वर्षांचा तरी आहे. यावर 7.1 टक्क्यांची सवलत मिळते. तुम्ही अशाप्रकारे वेगवेगळ्या योजनांतून गुंतवणूक करू शकता तेव्हा अशा योजनांची योग्य ती माहिती घेऊन तुम्हीही चांगला परतावा मिळवू शकता. यातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)