मुंबई : पाच राज्यांमध्ये आता काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने सर्व लोकं आपल्या कामाला लागले आहेत. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले निवडणूक पक्ष आणि उमेदवार देखील आपआपल्या परीने काम करण्यासाठी आणि जनतेला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्याचबरोबरच निवडणूक आयोगही निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी तयारी करत आहे. परंतु अशा स्थितीत शेवटी जनतेच्या किंवा मतदान दात्याच्या हातात योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु हे लक्षात घ्या की, मतदान करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्या नियमांची माहिती असणे देखील महत्वाचे आहे, जे मतदानाच्या वेळी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. वास्तविक, मतदान प्रक्रियेबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते. बऱ्याचदा लोकं फक्त मतदान कक्षात जातात आणि मत देऊन येताता. परंतु याच्याशी संबंधीत एक असा नियम आहे, जो लोकांना माहित नाही.


मतदान करताना एक 2 रुपयाचा असा नियम आहे, जो तुम्हाला तुमचे हक्क बजावण्यात मदत करतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, 2 रुपयांचा नियम काय आहे? वास्तविक, जिथे मतदान होते तिथे तुम्ही 2 रु. फी भरून तुमचा हक्क बजावू शकता.


अशा परिस्थितीत हे नियम काय आहेत आणि 2 रुपयांची यात काय भूमिका आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या परिस्थितीत कोणते नियम पाळले जाऊ शकतात हे देखील जाणून घ्या.


निष्पक्ष निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने आता EVM सोबत VVPAT ची व्यवस्था केली आहे. हे एक मशीन आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मताची स्लिप मिळते. फक्त समजून घ्या, जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा 7 सेकंदात तुम्हाला VVPAT मशिनमध्ये एक स्लिप दिसेल, ज्यामध्ये तुमचे मत कोणाला गेले आहे, याची तुम्ही खात्री करू शकता. तुम्ही तुमचे मत दिल्यानंतर तुम्हाला उमेदवाराचे निवडणूक चिन्ह इत्यादी सगळं त्यावर दिसतं.


परंतु, अनेक वेळा लोक आरोप करतात की, त्यांनी ज्या पक्षाचे बटण दाबले आहे, ते निवडणूक चिन्ह VVPAT मध्ये दिसत नाही. अशा स्थितीत मतदार त्याला आव्हान देऊ शकतो. या परिस्थितीत, मतदार 2 रुपये शुल्क भरून 'फॉर्म ऑफ डिक्लेरेशन'द्वारे आव्हान देऊ शकतो आणि नियम 49MA अंतर्गत कारवाई केली जाते.


यानंतर, पीठासीन अधिकारी मतदाराच्या तक्रारीवरून मॉक पोल घेतात आणि एकदा VVPAT तपासतात. मतदाराचा दावा खरा असल्यास मतदान थांबवून संबंधित अधिकाऱ्याला कळवले जाते.


मतदाराचा दावा खोटा असल्यास आणि VVPAT मशीन योग्यरित्या काम करत असल्यास, मतदारावर योग्य ती कारवाई केली जाते. अशा स्थितीत पोलिस काही कलमांच्या आधारे मतदारावर गुन्हाही नोंदवू शकतात.


पोलिंग एजंटही तक्रार करू शकतात


तुम्ही मतदानाला जाताना निवडणूक अधिकाऱ्यांसह पक्षाचे किंवा उमेदवाराचे पोलिंग एजंटही मतदान कक्षात बसलेले असतात हे तुम्ही पाहिले असेलच. हे पोलिंग एजंट मतदाराची ओळख पटवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत काम करतात. जर त्यांना वाटत असेल की, कोणी चुकीचा मतदार आहे आणि चुकीचे मतदान करत आहे, तर त्याला मतदान करण्यापासून रोखले जाऊ शकते.