Tyres Color Black: आजच्या दिवसाला प्रत्येक व्यक्तीच्या घरी एकतरी गाडी ही नक्कीच असते. गाडीमुळे प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनातील कामासाठी त्यांचा वापर केला जातो. शोरुममध्ये जेव्हा आपण कोणतीही गाडी घेण्यासाठी जातो, तेव्हा आपण वेगवेगळ्या रंगाच्या गाड्या तेथ असल्याचे पाहतो. त्यातून सगळ्यात चांगला रंग ज्या गाडीचा असेल ती गाडी आपण घेतो. त्यात कार, बाईक किंवा जीप पासून सगळी वाहनं असो. पण सगळ्यांमध्ये एकच गोष्ट साम्य असते ते म्हणजे गाडीचे टायर... आता तुम्हाला प्रश्न असेल की गाडीचे टायर हे प्रत्येक गाडीनुसार बदलत असतात. मात्र, तुमचे लक्ष कधीच गाडीच्या टायरकडे गेले नाही. गाडीच्या टायरचा रंग हा काळा का असतो हा विचार तुम्ही कधी केला आहे का? आणि हे टायर फक्त भारतात नाही तर परदेशातही टायर हे काळ्या रंगाचेच असतात. (Car and Bike's Tyres Colour Black)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या टायर्स विषयी अनेक शास्त्र आहेत, चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया... याशिवाय सर्व कंपन्या या काळ्या टायर्सला का उत्तम मानतात याविषयी एक अहवालही होता. या अहवालात, असे म्हटले आहे की कच्चा रबराचा रंग हा पिवळ्या रंगाच्या जवळपास असतो, परंतु जेव्हा या रबरापासून टायर बनवले जातात तेवहा ते लवकर झिजतात आणि मग आपल्याला सतत टायर बदलावे लागू शकतात. असे होऊ नये म्हणून टायर बनवणाऱ्या रबरमध्ये कार्बन मिसळला जातो,यामुळे हा टायर जास्त काळ टिकतो. टायरला मजबूत करण्यासाठी त्यात घातलेल्या कार्बनमुळे त्याचा रंग काळा होतो. इतकंच काय तर हा टायर जास्त काळ टिकून राहतो. कार्बन व्यतिरिक्त टायर बनवताना त्यात सल्फर देखील मिसळवण्यात येते, त्यामुळे टायर अजून मजबूत होतो. 


हेही वाचा : ... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच


तुम्हाला हे कळल्यावर नक्कीच आश्चर्य होईल की एकेकाळी गाड्यांचे टायर हे पांढऱ्या रंगाचे (White Colour Tyres) होते. पांढऱ्या किंवा मग ऑफ व्हाईट रंगाचे टायर हे काळ्या रंगाच्या टायरपेक्षा कमी मजबूत असतात. याच्या उलटं तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलांच्या सायकलचे टायर हे रंगीबेरंगी असतात. त्यांच्या सायकलचे टायर हे काही महिन्यातच खराब होऊ लागतात कारण त्यात कार्बनचा वापर करण्यात येत नाही. रिपोर्ट्सनुसार साध्या रबरचा टायर हा 8 हजार किलोमीटर जाऊ शकतो तर, कार्बन असलेला टायर हा 1 लाख किलोमीटर लांब अंतर पार करू शकतो.