मुंबई : जर तुम्ही देखील एलपीजी सिलेंडर खरेदी केले आणि सरकारकडून सबसिडी आली नसेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तुम्हाला आधी तपासावे लागेल. एलपीजी सिलेंडर दिवसेंदिवस महाग होत आहेत. अशा स्थितीत सबसिडीमुळे सामान्य लोकांना सिलिंडरच्या महागाईतून थोडा दिलासा मिळतो. सबसिडीची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर याचे कारण असु शकते की, तुम्ही याच्या नियमात बसत नाही. जर तुम्हाला एलपीजी सिलिंडरची सबसिडी तुमच्या खात्यात जात आहे की नाही हे माहित नसेल, तर ते शोधण्याचा कोणता मार्ग आहे का?


आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती देणार आहोत. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा कोणालाही विचारण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरी बसून ऑनलाईनच करू शकता. ही पद्धत खूप सोपी आहे.


1- सर्वप्रथम www.mylpg.in वेबसाइटला भेट द्या
2. यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
3- तुमचा सेवा पुरवठादार काहीही असो गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
4. यानंतर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची माहिती असेल.
5- वर उजव्या बाजूला साइन-इन आणि नवीन वापरकर्त्याचा पर्याय असेल, तो निवडा.
6. जर तुमचा आयडी आधीच तयार झाला असेल, तर तुम्हाला साइन इन करावे लागेल.
7-जर आयडी नसेल तर तुम्हाला नवीन यूजर निवडावा लागेल.
8. यानंतर, उघडणाऱ्या विंडोमध्ये उजव्या बाजूला व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीचा पर्याय असेल, तो निवडा.
9- तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तुम्हाला तेथे कळेल.
10- सबसिडी न मिळाल्यास तुम्ही 18002333555 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.


म्हणून अनुदान बंद होते


सरकार अनेक लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी देत​नाही, याचे कारण तुमचे आधार लिंक नसलेले असू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की, ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, मग सरकार त्यांना सबसिडीच्या कक्षेतून बाहेर ठेवते, म्हणजेच त्यांना सबसिडी दिली जात नाही.


जरी तुमचे स्वत:चे उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी तुमची पत्नी किंवा पती देखील कमावतात आणि दोघांचे मिळून उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, तरीही सबसिडी मिळणार नाही.


किती सबसिडी


सध्याच्या युगात घरगुती गॅसवरील सबसिडी खूपच कमी राहिली आहे. कोरोनाच्या काळात, ग्राहकांच्या खात्यात फक्त 10-12 रुपये सबसिडी म्हणून येत आहेत, जरी एक काळ असा होता की 200 रुपयांपर्यंतचे अनुदान सिलिंडरवर उपलब्ध होते. आता ग्राहकांना सिलेंडरवर नगण्य सबसिडी मिळत आहे, दुसरीकडे सिलिंडरच्या किंमतीतही खूप वाढ झाली आहे.