मुंबई : दैनंदिन जीवनात आपण इतके व्यस्त होतो की, आपण रोज वापरत असलेल्या गोष्टींकडे निट पाहात देखील नाही. लोकांसोबत असे बऱ्याचदा होते की, ते दररोज वापरत असलेल्या गोष्टींना निट पाहात नाही किंवा त्याच्याबद्दल जास्त विचार देखील करत नाही. त्यात तुम्हाला जर तुम्ही रोज वापरत असलेल्या गोष्टींचा फुल फॉर्म विचारला, तर तो तुम्हाला सांगता येईल? जसे सिमकार्ड, पॅन कार्ड, इत्यादी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला वाटेल की, अरे याचा तर आम्ही कधी विचार केला नाही किंवा त्याची कधी वेळ आली नाही. परंतु तुम्हाला आता हा फुल फॉर्म जाणून घेण्याची इच्छा झाली असेलच तर, आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील 5 गोष्टींचे फुल फॉर्म सांगणार आहोत.


SIM Card


मोबाईल फोन घेतल्यानंतर, लोकांना नंबरसाठी सिम कार्ड खरेदी करावा लागते, त्यानंतरच ते इतर वापरकर्तांना संपर्क साधू शकतील. परंतु इतक्या महत्वाच्या गोष्टीचा फुल फॉर्म फार कमी लोकांना माहित असेल, त्याचे संपूर्ण नाव आहे सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module).


PDF


ऑनलाइन दस्तऐवज बर्‍याचदा केवळ पीडीएफ स्वरूपात पाठवले जातात. पीडीएफ फाइल अधिकृत कामात देखील वापरली जाते. त्याचा फुल फॉर्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (Portable Document Format) आहे.


PAN CARD


देशात ओळख पत्र म्हणून पॅन कार्ड (PAN CARD) वापरले जाते. त्याचा फुल फॉर्म पर्मनंट अकाउंट नंबर (Permanent Account Number)आहे.


IFSC 


IFSC चा वापर बँकिंग व्यवस्थेत केला जातो. पैसे ट्रान्सफर करायचे असतील तेव्हा IFSC कोड आवश्यक असतो. वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये वेगवेगळे IFSC कोड असतात. म्हणून याचा वापर ऑनलाइन पैसे हस्तांतरणासाठी केला जातो. त्याचा फुल फॉर्म इंडीयन फायनॅन्स सिस्टीम कोड (Indian Financial System Code)आहे.


ATM


आपण पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनवर जातो, पण फार कमी लोकांना या एटीएमचा अर्थ माहित असेल. तर ATM चा फुल फॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन  (Automated Teller machine) आहे.