मुंबई : घराघरात दूध येतं. दुधाच्या पिशव्या सऱ्हास डसबिनमध्ये टाकल्या जातात. दुधाची पिशवी तुम्ही कशी फोडता किंवा उघडता असा प्रश्न विचारला तर? तुम्ही जर दूध कोपऱ्यातून तिरकं कापत असाल तर आजच ही पद्धत बंद करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूध पिशवी फोडताना आपण सोपं पडावं म्हणून तिरक्या पद्धतीनं कापतो आणि दूध ओतून घेतो. पण असं केल्याने नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. दूध पिशवी फोडण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


दुधाची पिशवी जर सरळ कापली तर त्याचा फायदा पर्यावरणासाठी होतो. IAS अधिकाऱ्याने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. दूध पिशवीचा कापलेला त्रिकोणी छोटा तुकडा रिसायकल होत नाही. त्याचा पर्यावरणाला धोका निर्माण होतो. 


दूध पिशवी कापताना ती सरळ आडवी कापायला हवी. त्यामुळे दूध सांडत नाही. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध पिशवी अख्खी राहाते आणि ती रिसायकल होऊ शकते. 


आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये म्हटलं की एक छोटीशी गोष्ट आहे जी खूप मोठा बदल घडवून आणू शकते. तेजस्विनी अनंत कुमार यांच्या म्हणण्यानुसार 50 लाखहून अधिक प्लॅस्टिकचे तुकडे कचऱ्यात जाण्यापासून आम्ही रोखले आहेत. हे प्लॅस्टिकचे तुकडे म्हणजे पर्यावरणासाठी हानिकारक घटक आहे. 



प्लॅस्टिकची पिशवी आडवी कापल्याने त्याचा फायदा रिसायकल करताना होतो. त्यामुळे ही पद्धत वापरण्यात यावी असं त्या म्हणतात. फक्त दूधच नाही तर अशा प्रकरच्या मिळणाऱ्या पिशव्यांपासून अनेक गोष्टी रिसायकल करून तयार करण्यात येतात. त्यामुळे ताक, दूध, लस्सीचे पाकीट आडव्या पद्धतीनं कापावं.