मुंबई : सरकारी नोकरीची कोणतीही परीक्षा किमान दोन टप्प्यात घेतली जाते. प्रथम उमेदवारांना प्राथमिक म्हणजेच लेखी परीक्षेतून जावे लागते, त्यानंतर ती उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत घेतली जाते, त्यानंतर एक अंतिम यादी तयार केली जाते. या दोन्हीमध्ये जे उमेदवार चांगली कामगिरी करतील, त्यांना ही नोकरी मिळते. ज्यामुळे त्यांचं सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होते. परंतु तुम्हाला माहितीय का? की केवळ IAS किंवा UPSC परीक्षांमध्येच विचित्र किंवा कठीण प्रश्न विचारले जात नाही तर, इतर सरकारी परीक्षांमध्ये देखील विचित्र प्रश्न विचारले जातात. ज्यावरुन त्या उमेदवारांनी आयक्यू लेव्हल टेस्ट केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला आम्ही तुमच्यासोबत असेच काही प्रश्न शेअर करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला विचित्र प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला मदत मिळेल.


प्रश्न- ते असं काय आहे जे नेहमी येत असतं, परंतु आपण कधीही तेथे पोहोचत नाही.
उत्तरः उद्या


प्रश्न- तुम्ही फक्त 2 चा वापर करुन 23 कसे लिहू शकता?
उत्तर- 22+2/2


प्रश्न- एका महिलेचा जन्म 1935 मध्ये झाला आणि 1935 मध्येच तिचा मृत्यू झाला, पण मृत्यूच्यावेळी तिचे वय 70 वर्षे होते. पण हे कसं शक्य आहे?
उत्तर- 1935 हा त्यांच्या घराचा नंबर होता.


प्रश्न- भारत आणि चीनच्या सीमेवर कोंबडीने अंडी दिली तर ती अंडी कोणाची असतील?
उत्तर: कोंबडीचीच


प्रश्न- हिंदीत आणि मराठीत कॅल्क्युलेटरला काय म्हणतात?
उत्तर- कॅल्क्युलेटरला मराठीत गणन यंत्र आणि हिंदीत परिकलक म्हणतात.