सायकल असो वा ट्रक... सगळ्याच वाहनांच्या टायरचा रंग काळा का असतो? या मागचं कारण फारच रंजक
या दुनियेत इतके रंग आणि छटा आहेत की, बऱ्याच रंगाची आपल्याला नव्याने ओळख पटते.
मुंबई : या दुनियेत इतके रंग आणि छटा आहेत की, बऱ्याच रंगाची आपल्याला नव्याने ओळख पटते. प्रत्येक रंगाचं स्वत:चं आपलं महत्व असतं. तसेच प्रत्येक रंगाची आपली एक वेगळी अशी ओळख असते. त्यामुळे काही ठरावीक गोष्टींना ठरावीक रंग दिले जातात. जसे की, लाल, काळ, पांढरा, हिरवा इत्यादी. आता वाहनांचे टायरबद्दलच बोलायचं झालं तर सायकल आणि बाईकपासून ते कार आणि ट्रकपर्यंत सर्वांचाच रंग हा काळा असतो.
मग तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की, प्रत्येक चाकाचा रंग हा काळाच का असतो? तर याचा संबंध आहे ताकदीशी... आता तुम्ही म्हणाल की रंग आणि ताकद याचा काय संबंध? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
परंतु एकदा फक्त विचार करा की बाइक आणि कारपासून मोठ्या वाहनांचे टायर काळ्या ऐवजी लाल, पिवळे किंवा निळे केले तर काय होईल?
खरंतर टायर बनवण्यासाठी रबरमध्ये कार्बन जोडला जातो.
सर्वप्रथम, हे जाणून घ्या की, टायर रबरचे बनलेले आहेत आणि कच्च्या रबरचा रंग हलका पिवळा असतो. परंतु रबरापासून टायर बनवायला लागल्यावर ते लवकर झिजायला लागले. अशा संशोधनात असे आढळून आले की, रबरला ताकद देण्यासाठी कार्बन आणि सल्फर जोडले जाऊ शकते.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, रबर लवकर झिजत नाही, त्यामुळे त्यात कार्बन मिसळला जातो आणि कार्बनचा रंग काळा असल्याने टायरचा रंगही काळा होतो.
अहवालानुसार, साधा रबरचा टायर सुमारे 8000 किमी टिकू शकतो, तर कार्बनयुक्त रबरचा टायर 1 लाख किमीच्या अंतराच्या 12 पट जास्त टिकू शकतो.
टायरला ताकद देण्यासाठी रबरमध्ये सल्फर देखील कार्बनमध्ये मिसळले जाते. रबर मऊ असेल की कडक, हे त्यात मिसळलेल्या कार्बनच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
आता विचार करा टायर लाल-पिवळे-निळे बनू लागले तर काय होईल?
लहान मुलांच्या सायकलवर लाल-पिवळे किंवा इतर रंगाचे टायर तुम्ही पाहिले असतीलच! हे रंग मुलांना आकर्षित करतात. परंतु ते लहान मुलांसाठी ठिक आहे पण इतर वाहनांसाठी टायर मजबूत असायलाच हवेत, कारण यावरती खूप भार असतो.
त्यामुळे जर मोठ्या वाहनांचे टायर लाल, पिवळे, निळे किंवा अन्य रंगाचे बनवले, तर त्यातील कार्बनचे प्रमाण कमी करावे लागेल आणि त्याऐवजी रंग त्यामध्ये टाकावे लागतील. त्यामुळे जर कार्बनचे प्रमाण कमी असेल, तर टायर कमी मजबूत होतील. त्यामुळे अपघात देखील वाढतील.
कमकुवत टायर हे सारखे-सारखे बदलावे लागू शकते, तसेच वाहनांचा मेन्टेनन्स देखील लक्षणीय वाढेल. तथापि, भविष्यात असे होऊ शकते की, कार्बनला पर्याय सापडेल आणि कार, ट्रक आणि बरेच काही मध्ये रंगीबेरंगी आणि सुंदर टायर दिसू शकतील!