प्रवासादरम्यान का येते झोप? यामागचं कारण फारच रंजक
तसे पाहाता प्रवासातील झोपेसंदर्भात संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
मुंबई : असं बऱ्याच लोकांसोबत घडतं की, जेव्हा ते कुठेही लांबच्या प्रवासाला जातात, तेव्हा गाडीत बसताच त्यांना झोप येऊ लागते. तुम्ही प्रवासापूर्वी कितीही झोपलेले असाल किंवा तुमची झोप पूर्ण देखील झाली असेल, तरी बऱ्याच लोकांना प्रवासात झोप येते. शक्यतो हे आपल्याला कारमध्ये किंवा बसमध्ये बसल्यावर जास्त जाणवते. परंतु असं का होतं? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर आज आम्ही तुम्हाला यामागे असलेलं सायन्स सांगणार आहोत.
तसे पाहाता प्रवासातील झोपेसंदर्भात संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामागे गती, कंटाळा आणि महामार्गावरील संमोहन (Highway Hypnosis) हे कारण सांगण्यात आले आहे.
जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल, तर त्याआधी तुम्ही खूप तयारी करता. याशिवाय काहीही चुकू नये, या गोष्टी तुमच्या मनात चालू राहतात. या प्रकरणात तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाही. याला स्लीप डेट म्हणतात आणि हेच सर्वात मोठं कारण आहे की, आपल्याला प्रवासादरम्यान झोप लागत नाही.
संशोधनानुसार, चालत्या वाहनात असतानाच लोकांना झोप येते. कारण व्यक्ती जेव्हा काहीही करत नाही. या दरम्यान त्याचं मन आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीत पोहोचतं. त्यामुळे प्रवासादरम्यान लोकांना झोप येऊ लागते. या स्थितीला हायवे संमोहन म्हणजेच Highway Hypnosis म्हणतात.
संशोधनात असे म्हटले आहे की, चालत्या वाहनातील हालचाल देखील प्रवासादरम्यान झोप आणण्याचे काम करते. या दरम्यान लहानमुलांना झोपवण्यासाठी पाळणा जसं काम करतं, तसंच ही गाडी आपल्याला झोपवण्याचं काम करते. विज्ञानाच्या भाषेत त्याला Rocking Sensation म्हणतात.
अशावेळी व्यक्ती एकाच फ्लोमध्ये हलत असतो. जेव्हा तुम्ही त्याच प्रवाहात फिरता तेव्हा त्याला रॉकिंग संवेदना म्हणतात. याचा मेंदूवर सिंक्रोनाइझिंग प्रभाव पडतो. ज्याद्वारे तुम्ही स्लीपिंग मोडमध्ये जाता. त्याला स्लो रॉकिंग असेही म्हणतात.