मुंबई : Indian Railways Train Name: भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. बर्‍याच लोकांना ट्रेनच्या नंबरपेक्षा ट्रेनचे नाव माहिती असते. ट्रेनच्या क्रमांकाप्रमाणे त्यांची नावेही वेगळी असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? की कोणत्याही ट्रेनचे नाव कसे ठरते?


राजधानी ट्रेनचे नाव कसे पडले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी ट्रेन एका राज्यातून दुसऱ्या राज्याच्या राजधानीला जोडण्यासाठी सुरू करण्यात आली होती. राजधानी दिल्लीसह राज्यांच्या राजधानी दरम्यान जलद गाड्या चालवण्यासाठी आणि लोकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी 'राजधानी' ट्रेन सुरू करण्यात आली आणि म्हणूनच तिला राजधानी असे नाव देण्यात आले.


राजधानी ट्रेन वेगासाठी ओळखली जाते. सध्या तिचा वेग 140 किमी प्रतितास आहे. राजधानी ही भारतातील सर्वाधिक पसंतीची ट्रेन आहे आणि तिचा वेग वेळोवेळी अपग्रेड करण्यात आला आहे.


'शताब्दी' नावामागे कारण?


जलद धावणाऱ्या शताब्दी ट्रेनने लाखो प्रवासी प्रवास करतात. 400 ते 800 किमी प्रवास करणारे प्रवासी या ट्रेनला पसंती देतात. शताब्दीचा वेग 160 किमी प्रतितास आहे. यात स्लीपर कोच नसून फक्त एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे.


ही ट्रेन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 1989 मध्ये सुरू करण्यात आली होती. नेहरूंच्या जन्मशताब्दी दिनी सुरू झाल्यामुळे याला 'शताब्दी' असे नाव देण्यात आले.


काय आहे दुरांतोची कहाणी?


दुरांतोचा वेग 140 किमी प्रतितास आहे. तिला कमी थांबे आहेत आणि ही ट्रेन लांब पल्ल्याचा प्रवास करते. दुरांतोचे नाव निर्बदा या बंगाली शब्दावरून पडले ज्याचा अर्थ 'restless' आहे. या ट्रेनला थांबे कमी असल्याने त्याला restless म्हणजेच दुरांतो असे नाव देण्यात आले आहे.


दुरांतो दररोज फक्त विशेष परिस्थितीत चालवली जाते. ही ट्रेन आठवड्यातून फक्त 2 ते 3 दिवस चालवली जातात.