मुंबई : हे असं का, ते तसं का, याचा रंग असा का आणि त्याचा आकार तसा का.... असे एक ना अनेक प्रश्न लहान मुलांच्या मनात येतात. मुळात हे प्रश्न काही लहान मुलांपुरताच मर्यादित नहीत. कारण, ते आपल्यालाही पडतात. फक्त लहानगे ज्याप्रमाणे त्या प्रश्नाचं उत्तर मिळवूनच शांत राहतात त्या तुलनेच आपण मात्र उत्तर नाही मिळालं तरीही दुसऱ्या एका कामात गुंतून जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या मनातील अशाच एका प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. हा प्रश्न आहे घरगुती वापरात येणाऱ्या गॅस सिलेंडरबाबतचा. (lpg gas cylinder)


घरगुती वापरात येणाऱ्या गॅस सिलेंडरचे अनेक फायदे. रोजचं जेवणच याच्या मदतीनं होतं, ही बाबही तितकीच महत्त्वाची.


गेल्या काही काळापासून गॅस सिलेंडरच्या दरांनी सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. हा मुद्दा काहीसा बाजुला सारत एक गोष्ट माहित करुनच घ्या, की गॅस सिलेंरला ठराविक रंग का दिले जातात? 


लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) एलपीजी हे लाल रंगातच रंगवले जातात. त्यांचा आकरही लंबगोलाकृती असतो. यामागे खास कारण आहे. सिलेंडरला लाल रंग दिला जातो, कारण दूरूनही तो नजरेत यावा. याचा फायदा सिलेंडरची ने-आण करण्यामध्ये दिसून येतो. 


सिलेंडरचा आकार लंबगोलाकृती असतो. त्याचप्रमाणे या गॅस वाहून नेणाऱ्या वाहनांवरही अशाच मोठाल्या लंबगोलाकृती टाक्या असतात. ज्यामध्ये गॅस साठवला जातो. यामागचं कारण म्हणजे अशा आकारामध्ये गॅस किंवा तेल आणि तत्सम पदार्थ समान प्रमाणात पसरतात. ज्यामुळे गॅस साठवण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय ठरतो. आहे की नाही Interesting?