डिलिव्हरी बॉयने टीप म्हणून पैशांऐवजी मागितला कांदा; मागणी ऐकून जोडपं म्हणाले, `तंत्र-मंत्र..`
Bengaluru Man: बेंगळुरात एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. डिलिव्हर एजंट पार्सल घेऊन आला मात्र त्याने केलेली मागणी ऐकून जोडप्याला एकच धक्का बसला.
Bengaluru Man: डिलिव्हरी एजेंट पार्सल घेऊन घरी आल्यानंतर साधारणतः ग्राहकांना पाणी किंवा टिप मागतात. मात्र, एका डिलिव्हरी एजंटने ग्राहकाकडून असं काही मागितलं की तोदेखील हैराण झाला. त्याने हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
रेडिट युजर Yashwantptl7 यांनी एका ऑनलाइन अॅपवरुन सामान मागवलं होतं. डिलिव्हर एजंट पार्सल घेऊन आला. मात्र, एजंटने टिप किंवा पाणी न मांगता ग्राहकाकडे कांदा मागितला. सुरुवातीला डिलिव्हरी एजंटची मागणी ऐकून ग्राहकही आश्चर्यचकित झाला आहे. Yashwantptl7 यांनी म्हटलं आहे की, 'काय घडलं माहितीये, संध्याकाळी मी माझ्या पत्नीसोबत चर्चा करत असताना लक्षात आलं की आम्हाला किराणा काय काय लागणार आहे. त्यानुसार मी ऑर्डर केलं.'
डिलिव्हरी एजंट सामान घेऊन घरी पोहोचला. त्यांनी पुढे म्हटलं की, ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही डिलिव्हरी एजंटला धन्यवाद दिले. मात्र त्याने आमच्याकडे भलतीच मागणी केली. डिलिव्हरी एजंटने विचारलं की सर एक कांदा मिळु शकतो का? डिलिव्हरी एंजटने मागणी केल्यानंतर मी त्याला विचारलं की कांद्याची काय गरज? त्यावर त्याने म्हटलं की, असंच, खाण्यासाठी पाहिजे. मी त्याला विचारलं की कांदा घेतल्यानंतर काही तंत्र-मंत्र तर नाही करणार ना. तेव्हा त्याने गोड हसत नाही सर असं उत्तर दिलं.
डिलिव्हरी एजंट कांदा घेऊन गेला तेव्हा मी आणि माझ्या पत्नीने याविषयांवर चर्चा केली. तेव्हा खरंच त्याला खाण्यासाठी कांदा हवा होता की तंत्र मंत्र करण्यासाठी असा प्रश्न आम्हाला पडला. माझ्या पत्नीने म्हटलं की, कदाचित इथे कांदे खूप महाग असतील त्यामुळं तो सगळीकडे कांदा मागत असेल. जेणेकरुन त्याच्याकडे जेवण बनवण्यासाठी पुरेसे कांदे जमा होतील. आता ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अनेक युजर्सने म्हटलं आहे की, कदाचित भाज्या महाग झाल्या असतील आणि त्यामुळं त्याला भाजी खरेदी करणे जमत नसेल. तर, एका युजर्सने मात्र काळ्या जादूच्या अफवेवर विश्वास ठेवला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, दुपारी जेवणासोबत तो भाजी व चपातीसोबत कांदा खायचा असेल. त्याला कारण विचारायला पाहिजं होतं आणि त्याला लोणचं द्यायला पाहिजे होते.