Doctor Rape Murder: कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे (Kolkata Doctor Rape Murder) पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर (postmortem report) एका आरोपीनेच नाही तर आणखी काही आरोपींनी महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला आहे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट वाचणाऱ्या डॉक्टर सुवर्ण गोस्वामी (Subarna Goswami) यांनी हा दावा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी हि माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेप नाही गँगरेप
डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 151 ग्रॅम शुक्राणू सापडले आहेत. एका व्यक्तीच्या शुक्राणूंची मात्रा इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही. त्यामुळे अत्याचारात अनेक आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असल्याचं डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी म्हटलं आहे. डॉक्टर गोस्वामी या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हरमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त महासचिव सुद्धा आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे हा रेप नसून गँगरेप असल्याचं स्पष्ट होतंय. मृत महिलेच्या कुटुंबियांनी देखील या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 


संपूर्ण देशभरात पडसाद
कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असून देशभरातील डॉक्टरांमध्ये संताप पसरला आहे. इंडियन मेडिअल असोसिएशनचे वरिष्ठ सदस्य कोलकत्यातल्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेण्याची शक्यता आहे. कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्येच गेल्या आठवड्यात या महिला डॉक्टराचा मृतदेह सापडला होता. 


रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये मृतदेह
नऊ ऑगस्टच्या सकाळी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतेदह सापडला होता. महिला डॉक्टरच्या संपूर्ण शरीरावर जखम्या आढळल्या होत्या तसंच तिची मानही मोडण्यात आली होती. म्हणजे अत्याचार करुन नंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आलीय.


सहा दिवस कामबंद आंदोलन
महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधल्या ज्युनिअर डॉक्टर्सने सलग सहा दिवस कामबंद आंदोलन केलं. कँडल मार्च आणि प्रदर्शन करत आरोपीला कठोर शिक्षा करत न्यायाची मागणी केली आहे. तर बांगलादेशच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.