Kolkata Rape Case : `नराधमच्या मारहाणीत माझ्या लेकीचा मृत्यू, हे एकटाच...` , कोलकता आरोपीच्या सासूचा खळबळजनक खुलासा
Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या सासूने खळबळजनक खुलासा केलाय. संजय एकट्याने ज्युनियर डॉक्टरची हत्या करुन शकत नाही, असा दावा त्यांनी केलाय.
Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकातामधील आरजी कार हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुणीची हत्येचे सत्य शोधण्यासाठी सीबीआय कसून चौकशी करत आहे. दिवसरात्र ते हॉस्पिटलच्या प्रत्येक काना - कोपरा पिंजून काढत आहेत. ज्युनियर डॉक्टरांचे मित्र, रुग्णालयातील अधिकारी आणि रक्षकांचीही त्यांनी कसून चौकशी केली. मात्र आजतागायत कोणताही भक्कम सुगावा सीबीआयचा हाती लागलेला नाही. दरम्यान, नराधम आरोपी संजय रॉय याच्या सासूने धक्कादायक खुलासा करत संजय रॉय यांचं वर्तन कसं आहे? तो हत्या करू शकतो की नाही? याबद्दल सांगितलंय. (Kolkata Doctor Rape Murder Case Update sanjay rai mother in law revealed the secret)
'त्याच्यामुळे मुलीचा मृत्यू'
संजय रॉयची सासू दुर्गा देवी या म्हणाल्यात की, माझ्या मुलीचं त्यांच्यासोबत हे दुसरं लग्न होतं. आम्हाला त्याच्या पहिल्या लग्नाची माहिती होती, पण त्याने घटस्फोट घेतल्याच सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही लग्नाला होकार दिला. मात्र लग्नाच्या 6 महिन्यांनंतर तो माझ्या मुलीचा छळ करू लागला. तिला खूप मारायचा. त्यामुळे माझी मुलगी आजारी पडू लागली. त्या नराधमाच्या मारहाणीमुळे माझ्या मुलीने तिचं बाळ गमावलं. मुलीच्या लग्नाला 2 वर्षही उलटली नव्हती आणि मुलीचा त्याच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला.
तुम्ही त्याला फाशी द्या!
त्या पुढे म्हणाल्यात की, 'मारहाण होईल या भीतीने आम्ही कालीघाट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, पण पोलिसात त्यांचा इतका दबदबा होता की, पोलिसांनी त्यांना परत पाठवलं. म्हणाले, भविष्यात असे केले तर कळवा. तो आम्हाला दादागिरी करायचा. पोलिसात काम करतो, असे तो म्हणायचा. आमचे कोणीही नुकसान करू शकत नाही. आता तुम्ही त्याला फाशी देऊ शकता, पण एक गोष्ट नक्की की हे काम एकटा संजय करू शकत नाही. त्याच्यात तेवढी हिम्मत नाही.'
तपास यंत्रणांनाही संशय!
दरम्यान संजय रॉयच्या सासूबाईंच्या या वक्तव्यानंतर ज्युनियर डॉक्टरच्या हत्येमध्ये त्याचा एकटाच सहभाग नाही, सीबीआयची शंका अजून मजूबत होतेय. या घटनेत रूग्णालयातील आणखी अनेक लोक सामील असण्याची शक्यताही मुलीच्या पालकांनी आधीच व्यक्त केली आहे. यामागे आणखी लोकांचा हात असल्याचा संशयही तपास यंत्रणांना आहे. यामागे काही बडे लोक असल्याचा संशय त्यांना असून सत्य लपवले जात असल्याची दाट शक्यता त्यांना वाटतेय.