Kolkata Rape Murder Case: प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये का झोपली? CBI च्या तपासातून मोठा उलगडा
Kolkata Rape Murder Case CBI Investigation Latest Update : RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल डॉक्टरचा बलात्कार आणि हत्येचा तपास करणाऱ्या CBI ला मोठं यश मिळालंय. घटनेच्या रात्री लेडी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये का झोपली होती, याचं गूढ त्यांनी उकलंय.
Kolkata Rape Murder Case CBI Investigation Latest Update : कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात दररोज नवं नवं खुलासे होत आहे. या प्रकरणाचा तपास CBI कडे असून ते या प्रकरणात कसून चौकशी आणि शोध घेत आहेत. या घटनेच्या वेळी महिला डॉक्टर ही सेमिनार हॉलमध्ये झोपण्यासाठी गेली होती. नीरज चोप्राचा सामना पाहिल्यानंतर ती खोलीमध्ये न जाता सेमिनार हॉलमध्ये का झोपण्यासाठी गेली? असा प्रश्न सीबीआयला पडला होता. या प्रश्नाच उत्तर शोधण्यात सीबीआयला यश मिळालंय. (kolkata doctor rape murder CBI Investigation Latest Update Why did the trainee doctor sleep in the seminar hall)
सीबीआयच्या सूत्रांकडून अनेक माहिती समोर येत असून सीबीआयला संभाव्य कारणांची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारही ॲक्शन मोडमध्ये आलीय. कोलकाता पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलंय.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री अनेक रुग्ण स्लीपिंग वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली असतात. त्यामुळे रुग्णाला झोपताना निरीक्षणाखाली ठेवावं लागतं. त्या वॉर्डात सहसा जास्त रुग्ण नसल्यामुळे प्रभारी डॉक्टर रोज रात्री तिथे झोपायचे किंवा आराम करायचे. मात्र घटनेच्या रात्री त्या वॉर्डात एक पेशंट आल्याने तरुण डॉक्टरला सेमिनार हॉलमध्ये झोपायला जावं लागलं, असं समोर आलंय.
हेसुद्धा वाचा - आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...
हाच सेमिनार हॉल आहे, जिथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी या सेमिनार हॉलला 10 पेक्षा जास्त वेळा भेट देऊन पुरावे गोळा केलेत. सेमिनार हॉलमध्ये घटना घडत असतानाही तेथे दुरुस्तीचं काम करण्यात आलं. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे पुसले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआय पथकाचा तपास वारंवार सेमिनार हॉलमध्ये अडकत आहे.
दरम्यान, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आरजी कार प्रकरणावर सुनावणी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता पोलीस आणि पश्चिम बंगाल सरकारला अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यासोबत या प्रकरणाच्या चौकशीवरुन सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी अनेक कोलकाता पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आलीय.