Kolkata Sexual Assault Case : संपूर्ण देशभरातून सध्या कोलकाता येथे महिला ज्युनिअर डॉक्टरवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर अतिशय निघृणपणे पीडितेची हत्या करण्यात आल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. याच धर्तीवर FAIMA म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असेसिएशनच्या वतीनं 13 ऑगस्टपासून देशव्यापी आंदोलन करत घडल्या प्रककरणाचा कडाडून विरोध करण्याचं ठरवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघटनेकडून सध्या पीडितेला न्याय देत नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत असून, ही मागणी मान्य होईपर्यंत देशभरातील रुग्णालयांमधील ओपीडी आणि इतर पर्यायी सेवा- सुविधा बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या अतिशय निंदनीय आणि मन हेलावणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा विरोध करत वैद्यकिय संघटनांनी हे आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. 


X च्या माध्यमातून FAIMA च्या वतीनं करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठीच्या सूर आळवण्यात आला. 'आम्ही देशभरातील आंदोलनकर्त्या डॉक्टरांची साथ देत आहोत. उद्यापासूनच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही देशभरातील डॉक्टरांना करत आहोत' अशी साद या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली. 


तिथं इंडियन मेडिक असोसिएशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित पीडितेला न्याय मिळवून देण्यासंदर्भातील मागणी करण्यात आली. या असुरी वृत्तीचा नायनाट करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी IMA नं केली. निष्पक्ष आणि सखोल तपाचाची मागणी करत आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी न्यायालयापुढं सादर करण्याची बाब या पत्रातून अधोरेखित करण्यात आली. सोबत नोकरीच्या ठिकाणी डॉक्टर आणि त्यातही महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं काही पावलं उचलण्यात यावीत अशीही मागणी केली. 



कोलकात्यामध्ये नेमकं काय घडलं की सबंध देशात संतापाची लाट? 


शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ज्युनिअर महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीमध्ये आढळल्यामुळं एकच खळबळ माजली. इथं सेवेत असणाऱ्या 31 वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरवर गुरुवारी रात्री उशिरा लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिची अतिशय निघृणपण हत्या केल्याची बाब प्राथमिक तपासातून समोर आली. 


पीडितेच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळल्यामुळं आणि तिच्यासोबत झालेल्या दुष्कृत्यामुळं या संपूर्ण प्रकरणानं देशभरातून संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळतात सदर रुग्णालयाच्या सेवेत असणाऱ्या डॉक्टरांनी आंदोलनं करत या प्रकरणाचा तपास तातडीनं आणि वेगात सुरू करण्याची मागणी करत सखोल चौकशी, दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा अशा मागण्या उचलून धरल्या. 


हेसुद्धा वाचा : मानेचं हाड तुटलेलं, शरीरावर जखमा... सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ


 


शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचारानंतर दोन वेळा तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सकाळी 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास पीडितेचा मृत्यू ओढावला. 


सदर प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, संयज रॉय असं त्याचं नाव. मद्यपानाच्या आहारी गेलेला हा आरोपी अश्लील व्हिडीओ पाहण्याच्या व्यसनाधीन होता. गुन्हा घडला त्या दिवशी तो बऱ्याचदा रुग्णालयात ये- जा करताना दिसला. आरोपीच्या चौकशीदरम्यान आणि घटनास्थळावरून हाती लागलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून अनेक खळबळजनक खुलासे झाले असून, आता या घटनेमध्ये पीडितेला न्याय मिळून आरोपीला नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाते याकडे  संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.