RG Kar Hospital Lady Doctor Death : कोलकातातल्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला ज्यूनिअर डॉक्टराचा मृतदेह (Medical Student Death) संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार महिला डॉक्टच्या दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त वाहात होतं, हातावर जखमा आहेत. प्रायव्हेट पार्टमधूनही रक्त येत असल्याचं रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे. याशिवाय पोट, डावा पाय, मान आणि उजव्या हातावरही जखमा आढळल्या आहेत.
मध्यरात्री रुग्णालयात नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरची हत्या गुरुवारी मध्य रात्री तीन ते सकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे. तिचं मानेचं हाड तुटलं होतं, त्यामुळे आरोपीने आधी तिचा गळा घोटला असावा अशी शक्यता पोलिसांनी (Kolkata Police) वर्तवली आहे. मृतदेह अर्धनग्न होता. पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या प्राथमिक अंदाजानुसार लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली गेली असावी. मृत महिला डॉक्टर ही द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी रात्री ती आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर तैनात होती.
महिला डॉक्टराच्या वडिलांचा आरोप
मृत महिला डॉक्टरांच्या वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाकडून सत्य लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी तिच्याबरोबर त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या इतर डॉक्टर आणि नर्सची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली दखल
ज्यूनिअर महिला डॉक्टरच्या हत्येने कोलकाता शहरात खळबळ उडाली असून शिकावू डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बांगलादेशच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृत महिला डॉक्टरच्या पालकांना फोन करत दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाटी तीन सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
डॉक्टरांचं आंदोलन
आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह (RG Kar Hospital Lady Doctor Death) सापडल्यानंतर आपातकालीन वॉर्डातील डॉक्टर वगळता रुग्णालयातील सर्वा विभागातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. विद्यार्थी संघटनांनी हत्या प्रकरणाचा तात्काळ तपास करण्याची मागणी करत रॅली काढली. आमदार अग्निमित्र पॉल यांच्या सहित विरोधी भाजप पक्षातील नेत्यांनीही रुग्णालायचा दौरा करत स्वतंत्र्य चौकशीची मागणी केली आहे.