कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीचा यू-टर्न, म्हणाला `या` टेस्टसाठी मी तयार
Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता के आरजी कर मेडकिल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने यू-टर्न घेतला आहे. आरोपीची वकिल कबिता सरकारने संजय रॉय पॉलिग्राफी टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता के आरजी कर मेडकिल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने (Accused Sanjay Roy) यू-टर्न घेतला आहे. आरोपीची वकिल कबिता सरकारने संजय रॉय पॉलिग्राफ टेस्टसाठी (Polygraph Test) तयार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सत्य काय आहे ते जगासमोर येईल, संजय रॉय हा निर्दोष आहे, असं वकिल कबिता सरकार यांनी म्हटलं आहे. संजय रॉय हा सीबीआयला (CBI) सर्वोतोपरी मदत करायला तयार आहे, जेणेकरुन या घटनेमागचा खरा आरोपी पकडला जाईल, असंही कबिता सरकार यांनी म्हटलं आहे.
संजय रॉयची वकिल कबिता सरकारने एका वृत्तपत्रला ही माहिती दिलीय. कोलकाता प्रकरणाती आरोपी संजयर रॉय हा पॉलिग्राफ टेस्टसाठी तयार आहे. त्याने टेस्टसाठी सहमती दर्शवली आहे. पॉलिग्राफी टेस्ट काय असते हे त्याला आपण समजावलं आहे. त्यानंतर त्याने सहमती दर्शवली. संजय रॉय हा मानसिक दबावाखाली आहे, त्याच्यावर आरोप लावलण्यात आले आहेत, सत्य जगासमोर यावं असं त्याचं म्हणणं असल्याचं वकिल कबिता सरकारने म्हटलं आहे.
कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. वकिल कबिता सरकार यांनी संजय रॉयचं वकिलपत्र घेतलं आहे. यानंतर कबिता सरकार यांनी संजय रॉयची भेट घेतली. संजय रॉय सर्व प्रकारच्या चौकशीला तयार असल्याचं त्याने म्हटलं आहे. अटक झाल्यानंतर संजय रॉयने आपला गुन्हा कबूल केला होता. पोलीस चौकशीत नराधम संजय रॉयने 'मी गुन्हेगार आहे, मला फाशी द्या' असं म्हटलं होतं.
माजी प्रिन्सिपल आणि 4 ट्रेनी डॉक्टरांची पॉलिग्राफी टेस्ट
सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने आरोपी संजय रॉयच्या पॉलिग्राफी टेस्टला मंजूरी दिली आहे. त्याआधी आरजी कर मेडकिल कॉलेजचे माजी प्रिन्सिपल डॉ. संदीप घोष आणि चार ट्रेनी डॉक्टरांच्या पॉलिग्राफ टेस्टलाही मंजूरी देण्यात आली आहे. तर आरोपी संजय रॉयला सियालदहच्या स्पेशल कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय रॉय हा विकृत मनोवृत्तीचा असल्याचं सीबीआय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
पॉर्न साईट आणि दारूचं व्यसन
आरोपी संजय रॉयला पॉर्न साईट आणि दारूचं व्यसन आहे. शिवाय तो हिंसक प्रवृत्तीचा असल्याचंही सीबीआयने म्हटलं आहे. संजय रॉय मेडिकल कॉलेजचे माजी प्रिन्सिपल डॉ. संदीप घोष यांचा बाऊन्सर म्हणूनही कॉलेजमध्ये फिरायचा अशी माहितीही समोर आली आहे. आरोपी हा घटनेच्या ठिकाणी होता, याचं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलं आहे. आरोपी संजय रॉय 8 ऑगस्टला सकाळी 11 वाजता चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटजवळ दिसला होता. त्यानंतर 9 ऑगस्टला पहाटे चार वाजता रुग्णालय इमारतीत शिरताना दिसला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 आणि 9 ऑगस्टला संजय रॉयने वेगवेगळ्या कारणाने एकूण चार वेळा रुग्णालयात प्रवेश केला होता. यातल्या तीन वेळा तो रुग्णालयात केवळ राऊंड मारून बाहेर गेला होता. तर चौथ्यावेळी तो रुग्णालयाबाहेर पडला तेव्हा त्याने महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे घटनेच्या रात्री संजय रॉय रेड लाईट परिसरात गेला होता.