Kolkata Rape And Murder Case In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयामध्ये 22 ऑगस्ट रोजी कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरच्या बलत्कार आणि हत्येप्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सुनावणी सुरु असतानाच देशातील न्यायसंस्थेमधील सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती म्हणजेच सरन्यायाधीशांकडून एक चूक झाली. विशेष म्हणजे ही चूक सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना त्यांच्या सहकाऱ्याने लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ती सुधारली.


न्यायालयाने स्वत: दाखल करुन घेतला खटला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमधील प्रशिक्षणार्थी 31 वर्षीय डॉक्टरवर 9 ऑगस्टच्या रात्री बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सू-मोटो म्हणजेच स्वत:हून दखल घेत याचिका दाखल करुन घेतली. या याचिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी गुरुवारी, 22 ऑगस्ट रोजी पार पडली. ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय खडंपीठासमोर होत आहे. या प्रकरणामध्ये एक बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मांडत असून पश्चिम बंगाल सरकारची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत आहेत.


नेमकी काय चूक झाली?


दोन्हीकडून युक्तीवाद सुरु असतानाच सरन्यायाधीश चंद्रचूड आपल्या टीप्पण्याही नोंदवत होते. या युक्तीवादादरम्यान आपलं मत व्यक्त करताना चंद्रचूड हे आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलचा उल्लेख 'कर' ऐवजी 'कार' असा करत होते. त्यांनी अनेकदा असा उल्लेख केल्यानंतर न्या. ऋषिकेश रॉय यांनी त्यांना तुम्ही चुकीचा उच्चार करत असल्याचं निदर्शनास आणून दिलं. याचा खुलासा सरन्यायाधीशांनीच सुनावणीदरम्यान केला. "मी सतत 'कार', 'कार' असा उल्लेख करत असल्याचं निदर्शनास आणून देत न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी योग्य उच्चार 'कर' असल्याचं सांगितलं. मी दिलगीरी व्यक्त करतो," असं सरन्यायाधीश म्हणाले.


नक्की वाचा >> Kolkata Rape Case: '150 ग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'


या कॉलेज आणि हॉस्पीटलचा इतिहास काय?


आर. जी. कर मेडिकल कॉलेज 1886 साली कोलकाता स्कूल ऑफ मेडिसन म्हणून भारतीय डॉक्टर राधा गोपीदा कर यांनी स्थापन केलं होतं. त्यावेळी या संस्थेशी संलग्न असं कोणतंही हॉस्पीटल नव्हतं. 1902 साली कॉलेजची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. या संस्थेशी संबंधित हॉस्पीटलही सुरु करण्यात आलं. या कॉलेजचं नावं अनेकदा बदललं आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर या कॉलेजला पुन्हा मूळ संस्थापक डॉक्टर राधा गोपीदा कर यांच्या नाव देण्यात आलं. पश्चिम बंगाल सरकारने या संस्थेचं व्यवस्थापन ताब्यात घेतलं.


सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरच्या बलत्कार आणि हत्येप्रकरणाची पुढील सुनावणी 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.