Kolkata Trainee Doctor Murder Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने भलताच दावा केला आहे. रिपोर्टनुसार, संजय रॉयने पॉलीग्राफ टेस्टमध्ये CBIकडे दावा केला आहे की, 8 ऑगस्ट रोजी तो सेमिनार हॉलमध्ये का गेला होता, याबाबत त्याने अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्यांने मी गुन्हा केलाच नाहीये, असा दावादेखील केला आहे. 8 ऑगस्टच्या रात्री रुग्णाची तब्येत अधिक बिघडली होती. तेव्हा लगेचच ऑक्सिजनची गरज होती. त्यामुळं तो डॉक्टरांना शोधत तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये शिरला होता, असं आरोपीने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय रॉयने म्हटलं आहे की, जेव्हा तो सेमिनार हॉलमध्ये शिरला तेव्हा तिथे महिला डॉक्टरचा मृतदेह अस्तावस्थ अवस्थेत पडला होता. आधी मी तिला हलवून पाहिले पण काहीच हालचाल झाली नाही. ते पाहून मी घाबरलो. व तिथून बाहेर निघालो. तेव्हा गडबडीत मला कशाचा तरी धक्का लागला आणि त्यामुळं ब्लूटुथ तिथेच पडला, असा दावा त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर, तो जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा मेन गेटवर कोणीही नव्हतं. सिक्युरीटी गार्डदेखील नव्हता. व त्याला आत जाण्यापासून कोणीच अडवलं नाही, असंही त्याने म्हटलं आहे. सीबीआयनेही या प्रकरणात रुग्णालयाच्या दोन सिक्युरिटी गार्डची पॉलीग्राफ चाचणी केली आहे. 


कोलकत्ता बलात्कार प्रकरणात आत्तापर्यंत 10 जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. संजय रॉयची चाचणी 25 ऑगस्ट रोजी कोलकाताच्या प्रेसिडेंसी जेलमध्ये झाली होती. संजय व्यतिरिक्त आरजीकर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष ASI अनूप दत्ता, 4 फेलो डॉक्टर, 2 सिक्युरीटी गार्ड आणि एक वॉलिंटिअरदेखील सहभागी आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉयच्या शरीरावर जखमा होत्या. तसंच, त्याचे रक्त आणि त्वचेचे नुमने पीडित महिलेच्या नखात सापडल्याचे समोर आले आहे. पीडित महिला डॉक्टरसोबत झालेल्या झटापटीत त्याला जखमा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


संजय रॉयचे जेवणावरुन नखरे


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉय हा जेवणावरुन नखरे करत असल्याचे समोर आले आहे. तुरुंगात मिळणारी भाजी-चपाती त्याला नको असून तो दररोज जेवणासाठी नवी मागणी करत आहे. त्याला चमचमीत चाऊमीन हवे असल्याची मागणी त्यांनी केली आहे. यावरुन तुरुंग प्रशासनाने त्याला चांगलेच फटाकरले असून तुरुंगात सर्वांना एकसारखेच अन्न मिळेल, असं स्पष्ट केलं आहे.