तरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले `करत होत्या अश्लील...`
त्या मुलींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. व्हायरल होणारे काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. काही दिवसांपूर्वी असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दोन मुलींनी अश्लील डान्स केल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video)
आणखी वाचा : हत्तीनं लहान मुलीच्या डान्सची केली Mimicry, Video Viral
त्या दोन मुलींनीच हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्या व्हिडीओवरून चर्चेला सुरुवात झाली आहे. या मुलींनी अश्लील डान्स केल्याचं सांगितलं आणि राग मनात ठेवून दोन मुल दुचाकीवर आले आणि त्यांनी अमानुषपणे गरम रॉडनं मारहान केली. एवढंच काय तर या दोन्ही मुलींना त्यानंतर जीवेमारण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुचाकीस्वारांविरोधात तीव्र विरोध केला आहे. (kolkata two female dancers beaten to death with rod because of obnoxious dance on rasgulla song trending video 2022 )
आणखी वाचा : नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral
आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे
रिपोर्टनुसार, या मुलींनी नुकताच हिंदी आयटम सॉन्गचा व्हिडिओ शेअर केला. या मुलींची नावं सन्नाती मित्र आणि श्री भद्रा अशी सांगण्यात येत आहेत. 12 सप्टेंबर रोजी दोघेही दौपरिया चौकातून जात असल्याचा म्हटले जाते. यावेळी अचानक मास्क घातलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्यावर गरम रॉडने हल्ला केला. दोघेही दुचाकीवर होते. याशिवाय दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. (Two Dancers Beaten With Rod)
आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण
दोन्ही मुलींनी जवळच्या पोलीस स्टेशन रोहडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसली तरी ती खूपच घाबरलेली आहे. तो जखमी झाल्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. दोघेही सोशल मीडियाचे प्रसिद्ध चेहरे आहेत, अशा परिस्थितीत त्यांना बाहेर पडणं कठीण झालं आहे.