नवी दिल्ली : अॅक्सिस बँकेच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. बँकेचे सीईओ शिखा शर्मांचं कार्यकाळ कमी करण्याच्या मागणीनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु आहे. तर दुसरीकडे अॅक्सिस बँकेच्या विक्रीच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. आशियातल्या सगळ्यात श्रीमंत बँक असलेल्या अॅक्सिसला विकत घेण्यासाठी बोली लागू शकते. जपानच्या ब्रोकरेज फर्म नोमुरानं याबाबत एक रिपोर्ट दिला आहे. नोमुरानं केलेल्या दाव्यानुसार आशियातले सगळ्यात श्रीमंत बँकर उदय कोटक अॅक्सिस बँकेला विकत घेऊ शकतात. अॅक्सिस बँक भारतातली तिसरी सगळ्यात मोठी खासगी बँक आहे.


अॅक्सिसचं लोन बूक कोटकपेक्षा दुप्पट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅक्सिस बँकेचं लोन बूक कोटक महिंद्रा बँकेपेक्षा दुपट्टीनं जास्त आहे, असा दावा नोमुरानं केला आहे. जर दोन्ही बँका एकत्र झाल्या तर लोन बूक मोठ्या प्रमाणावर मोठं होणार आहे. तसंच या दोन्ही बँकांकडे एवढ्या शाखा असतील ज्या आधी कोणत्याच बँकेकडे नव्हत्या.


मर्जर झालं तर काय?


जर दोन्ही बँकांचं मर्जर झालं तर त्यानंतर निर्माण होणाऱ्या बँकेकडे ५,७६० शाखा असतील. एवढ्या शाखा देशातल्या कोणत्याही खासगी बँकेकडे नाहीत. आयसीआयसीआय बँकेकडे ४,८६० शाखा आहेत. मर्जर झालं तर बँकेचं लोन बूक ६.१६ लाख कोटी रुपये होईल. एचडीएफसी बँकेचं लोन बूक ६.३१ लाख कोटी रुपये आहे.


आरबीआयचाही दबाव


नोमुराच्या रिपोर्टनुसार आरबीआयचाही अॅक्सिस बँकेच्या बोर्डावर दबाव आहे. तसंच बॅकिंग इंडस्ट्रीच्या बॅलन्स शीट साफ करण्याची मोहीमही जोरदार सुरु आहे.


तुमच्या खात्याचं काय होणार?


अॅक्सिस बँकेला कोटक महिंद्रानं विकत घेतलं तर तुमचं अॅक्सिसचं खातंही कोटक महिंद्राच्या खात्यात ट्रान्सफर होईल.