Krishna Janmabhoomi Mathura Shahi Idgah Case: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाह मशिद प्रकरणामधील याचिकाकर्ते असलेल्या आशुतोष पांड्येंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाकिस्तानमधून धमकी देणारा कॉल आला होता. यामध्ये त्यांना याचिका मागे घेण्यास सांगत धमकावण्यात आलं. केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी व्यक्तीने शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदू याचिकाकर्ते आशुतोष पांड्येंच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल आला होता. याचिका परत घे अशा शब्दांमध्ये धमकावल्याची माहिती आशुतोष यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत दिली आहे.


फोनवर धमकी देणारा काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमधून आलेल्या या व्हॉट्सअप कॉलमध्ये हिंदू याचिकाकार्ते असलेल्या आशुतोष यांना धमकावताना, 'तुम्ही याचिका मागे घेतली नाही तर तुझी घंटा वाजवून टाकेन, इंशाल्लाह तुला बॉम्बने उडवून टाकेन. तू जे इदगाह-इदगाह करत फिरतोय ना त्याच इदगाहमध्ये तुझ्या अस्थी पुरुन टाकेन,' असे शब्द वापरण्यात आले. हा धमकीचा कॉल आल्यानंतर आशुतोष पांडेय यांनी फतेहपुर जिल्ह्यातील पोलीस स्थेटशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.


सध्या सुरु आहे या प्रकरणाची सुनावणी


मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाह मशिद प्रकरणावर सध्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली. याचिकार्ते आशुतोष पांडेय हे मथुरेला परत येत असताना त्यांची गाडी फतेहपूर शहरात दाखल झाली तेव्हा त्यांच्या मोबाईलवर हा व्हॉट्असअप कॉल आला. आपण याचिका मागे घेणार नाही असं आशुतोष यांनी फोनवर सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीने भारताविरोधी घोषणाबाजी करताना बॉम्बने तुला उडवून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर आशुतोष यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


या प्रकरणी पोलीस काय म्हणाले?


आशुतोष हे मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ति निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तसेच ते मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाह मशिद प्रकरणातील हिंदू पक्षाची बाजू मांडणारे मुख्य याचिकाकर्ते आहेत. "फोनवर मला याचिका मागे घेण्यासाठी धकावण्यात आलं. मला घाणेरड्या शिव्या दिल्या. तसेच तो भारताविरुद्ध वाईट विधान करत होता," असं आशुतोष म्हणाले. पोलीस अधिकारी शमशेर बहादुर सिंग यांनी या प्रकरणामध्ये मोबाईल क्रमांक ट्रेस करुन कारवाई केली जाईल असं सांगितलं. हा कॉल नेमका कोणी, कशासाठी आणि कोणत्या उद्देशाने केला. क्लोन सीमवरुन तर हा कॉल आला नव्हता ना यासंदर्भातील तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.