मुंबई : हिंदू धर्मात कुंभ मेळ्याला मोठं महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, इलाहबाद, उज्जैन आणि नाशिकमध्य़े भरतो. जेथे देश-विदेशातून अनेक भाविक येत असतात. कुंभमेळा 12 वर्षातून एकदा येतो. 2 कुंभमेळ्यामध्ये एक अर्धकुंभ देखील येतं. कुंभमेळा हा मकर संक्रांतीला सुरु होतो. या दिवशी कुंभस्नानाचा योग असतो. हिंदू धर्मानुसार अशी मान्‍यता आहे की, कुंभमेळ्यात पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास मनुष्य पापमुक्त होतो आणि मनुष्‍यला जन्म-पुनर्जन्म किंवा मृत्यु-मोक्ष प्राप्त होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये इलाहबाद येथे कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याची तारीख जाहीर झाली आहे. कुंभमेळा पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्य़टक देखील आवर्जून येत असतात. 


2019 कुंभमेळ्यातील शाहीस्नान 


14-15 जानेवारी 2019: मकर संक्रांती (पहलं शाही स्नान)
21 जानेवारी 2019: पौष पोर्णिमा
31 जानेवारी 2019: पौष एकादशी स्नान
04 फेब्रुवारी 2019: मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दूसरं शाही स्नान)
10 फेब्रुवारी 2019: वसंत पंचमी (तीसरं शाही स्नान)
16 फेब्रुवारी 2019: माघी एकादशी
19 फेब्रुवारी 2019: माघी पोर्णिमा
04 मार्च 2019: महाशिवरात्री