नवी दिल्ली : एका स्थानी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठं स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम यासह यंदाचं प्रयागराज कुंभ मेळा 2019 ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. सरकारने रविवार ही माहिती दिली. संस्कृतिक मंत्रालयाने म्हटलं की, 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या तीन सदस्यांनी कुंभमेळ्याचा दौरा केला. त्यांनी २८ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्य़ंत विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली. ४ दिवसांच्या चित्रकला स्पर्धेच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'२८ फेब्रुवारीला जवळपास ५०३ शटल बसेस, लोकांना आणण्यासाठी राजमार्गावर धावत होती. एक मार्चला या कार्यक्रमात अनेक लोकांनी हजेरी लावली. कुंभच्या स्वच्छतेसाठी १० हजार लोकांनी योगदान दिलं. सगळ्यांनी एकत्र आपलं कर्तव्य पार पाडलं.'



१४ जानेवारीला सुरु झालेला कुंभ मेळा ४ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी सहाव्या आणि शेवटच्या शाही स्नानाने संपन्न होणार आहे. मंत्रालयाने म्हटलं की, 'मागील शाही स्नानात २२ कोटी भाविकांनी हजेरी लावली.'