श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातीस हंदवाडा येथे जवळपास गेल्या ६० तासांपासून लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू असणाऱ्या या चकमकीत लष्कराकडून हंदवाडा परिसरात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात अखेर सुरक्षा दलाला यश आलं आहे. सध्या मिळत असणाऱ्या माहितीनुसार पॅरा कमांडोंकडे आता हे ऑपरेशन सोपवण्यात आलं होतं. ६० तासांहून अधिक काळासाठी सुरु असणाऱ्या या कारवाईत आतापर्यंत एकूण पाच जवान शहीद झाले आहेत. नागरी वस्ती असणाऱ्या भागात हे दहशतवादी लपले असल्यामुळे या ही चकमक प्रदीर्घ काळ चालत असल्याची माहिती मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत या चकमकीत जम्मू- काश्मीर पोलीसचे दोन अधिकारी आणि सीआरपीएफच्याही दोन अधिकाऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागल्याचं कळत आहे. त्याशिवाय आणखी एका जवानाला उपचारादरम्यान प्राण गमवावे वागले. इतकच नव्हे, तर या हल्ल्यात एका स्थानिकाचाही मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. ६० तासांहून अधिक काळ सुरु असणारी ही चकमक अखेर संपुष्टात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडूनच याविषयीची माहिती देण्यात आली. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. 




जाणून घ्या : बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान


लपून बसलेल्या दहशतवद्यांचा खात्मा करण्यासाठी संरक्षण दलांकडून एका घरावर बॉम्ब हल्ला करण्यात आला ज्यामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी घरात आलेल्या जवानांनवर हल्ला केला. ज्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन लपले. जेथून त्यांनी पुन्हा गोळीबारास सुरुवात केली. दहशतवादी वारंवार त्यांच्या लपण्याती ठिकाणं बदलत असल्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यास लष्कराला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.