नवी दिल्ली : बुधवारी दिल्लीची सकाळी थंड वाऱ्याने झाली. दिल्लीत तापमान ३.६ डिग्री सेल्सियसवर पोहोचलं. जे या वर्षातील सर्वात कमी तापमान आहे. जम्मूमध्ये देखील थंडी वाढली आहे. बुधवारी जम्मूचं तापमान या वर्षातील सर्वात कमी अंशावर गेलं. बनिहालमध्ये तापमान शून्य ते तीन डिग्रीच्या खाली पोहोचलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये थंड वारे वाहू लागल्याने तापमानात घट झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगढड, उत्तर प्रदेशमध्ये देखील थंडी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचलमधील नद्यांवर गोठल्या आहेत. श्रीनगरमधील डल झीलचा काही भाग देखील बर्फाखाली गेला आहे. उत्तर भारतातील ही ठंडी हवा लवकरच भारताच्या मध्य भागावर पोहोचणार आहे. २८ डिसेंबरनंतर पारा ३ अशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. हवामान खाताच्या तज्ज्ञांच्या मते सर्वाधिक तापमान २० डिग्री पर्यंत असू शकतं. हवामान विभागानुसार सकाळी ८ वाजेपर्यंत आद्रता ९७ टक्के असू शकतो.



जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गा जवळ असलेल्या बनिहाल आणि बटोटे तसेच डोला जिल्ह्यातील भदरवाहमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली पोहोचलं आहे. थंडीमुळे येथे लोकं संध्याकाळ होण्याच्या आधीच घरी परतत आहेत. मनाली, कल्पा, सोलन, चम्बा, श्योबाग, सुंदरनगर आणि भुंटरमध्ये देखील तापमान शून्य अंशाच्या खाली पोहोचलं आहे.