नवी दिल्ली : Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्ताने माखल्याचा टोला, शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी लगावला. दरम्यान, भाजपने (BJP) मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता असे सांगून योगी आदित्यनाथ यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा घ्यायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Lakhimpur Kheri Violence)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखीमपूर खेरीमध्ये कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांना दोन वाहनांना धडक दिल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला. असे सांगितले जात आहे की लखीमपूरमध्ये आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने चार शेतकऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी करणारे बुलेटिन जारी केले आहे. लखीमपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमारही लखीमपूरला पोहोचले आहेत.


शेतकरी आंदोलन करताना लखीमपूरची दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणाऱ्यांना असे केले जातं असेल तर जगासाठी हे धोकादायक आहे. ही भारत पाकिस्तान लढाई आहेका, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थानमध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरले असते. पण आज शेतकऱ्यांचे दुःख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाही, असे राऊत म्हणाले. काँग्रेस सोबत मतभेद असू शकतात, पण इंदिरा गांधी यांच्या नातीला अशी वागणूक देत आहात, हे योग्य नाही, असे राऊत म्हणाले. 


देशात ड्रग्स पुरवठा कुठून होतो? - राऊत


त्याचवेळी त्यांनी देशात ड्रग्स पुरवठा कुठून होतो, सवाल राऊत यांनी उपस्थित केला. गुजरात, जम्मूमध्ये ड्रग्जस मिळतो. देशात अमली पदार्थ व्यापार वाढला आहे, असा थेट आरोप केला. जगातील सर्वात मोठा ड्रग्जस साठा सापडला त्यावर केंद्र काहीच बोलत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. त्याचेवळी मुंबईत जे कुणी सापडले त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजेत, असे ते म्हणाले.