लखीमपूर हत्याप्रकरण : मुख्य आरोपीला वाचवतेय सरकार, प्रियंका गांधी यांचा आरोप
Lakhimpur murder case: लखीमपूर हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला वाचवायचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यांनी केला आहे.
लखनऊ : Lakhimpur murder case: लखीमपूर हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला वाचवायचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे. (Priyanka Gandhi attacks BJP government over Lakhimpur Kheri)
लखीमपूरच्या मुद्द्यावरुन प्रियंका गांधींनी पुन्हा टीका केली आहे. जोपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदी अजयकुमार टेनी आहेत, तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही, असं प्रियंका यांनी म्हटले आहे. आज उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये सुरक्षेसंदर्भात एक परिषद होत आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी एकाच मंचावर आहेत. टेनींबरोबर पंतप्रधानांनी मंचावर जाऊ नये, असे आवाहन प्रियंका गांधी केले.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी- वाड्रा यांनी 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचारावर उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी कानपूर रियाल्टर हत्येचा देखील समाचार घेतला. सप्टेंबरमध्ये गोरखपूरमधील प्रकरण आणि ललितपूरमध्ये कथित खतांचा तुटवडा यावरही भाष्य केले. आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या 37 व्या स्मृतिदिनानिमित्त गोरखपूरमध्ये त्यांच्या पक्षाच्या प्रतिज्ञा रॅलीला त्या संबोधित करत होत्या.
लखनऊमध्ये विवेक तिवारी यांची पोलिसांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गोरखपूरमध्ये कानपूरचे व्यापारी मनीष गुप्ता यांची पोलिसांनी निर्घृण हत्या केली. यूपीमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यावर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नाही, अशा त्या म्हणाल्या.