नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे रविवारी झालेल्या हिंसेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते आणि भाजप नेत्याच्या एका चालकाचाही समावेश होता. लखीमपूर प्रकरणी सध्या वातावरण चांगलंच तापलेलं असताना विविध पक्षांचे कार्यकर्ते आता त्या दिशेनं कूच करु लागले आहेत. त्यातच आता काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री प्रियंका गांधी या लखनऊ येथून लखीमपूर खीरी येथे पोहोचल्या. ज्यानंतर पोलिसांनी सीतापूरमधील हरगाव येथून त्यांना ताब्यात घेतलं. ज्यानंतर त्यांना पोलीस स्थानकात नेण्याच्या हाचलाचील सुरु झाल्या. काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा यांनाही यावेळी ताब्यात घेण्यात आलं. 


प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांना भेटायला जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना अटक करणं हा तर संघर्षाची एक सुरुवात आहे. असं म्हणत समर्थकांनी किसान एकतेचे नारे दिले. 


नेमकं प्रकरण काय? 
लखीमपूर खीरी येथे हॅलिपॅडवर सुरु असणाऱ्या आंदोलनानं हिंसक रुप घेतलं ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. रविवारी लखीमपूर खीरी येथे उत्तर प्रदेशाती उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा दौरा अपेक्षित होता. पण, ते या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच इथं शेतकऱ्यांनी त्यांचा विरोध सुरु केला होता.