नवी दिल्ली : लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मोठा निर्णय घेत रिजर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) लक्ष्मी विलास बँकेवर काही प्रतिबंध घातले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून एका महिन्याला फक्त २५ हजार रूपये काढता येणार आहेत. या आधी रिजर्व बँकेने पीएमसी बँकेवर देखील अशा प्रकारचे निर्बंध लादले होते. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार बँकेवर महिन्याभराची मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. हा आदेश एबीआय कायद्याच्या कलम ४५ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने जारी केलेल्या या नव्या नियमांमूळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय उपचार, शिक्षण इत्यादी आवश्यक खर्चासाठी २५ हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. 


सांगायचं झालं तर बँकेची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे बँकेला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बँकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर व्यवहार पुन्हा सुरळीत होतील असं देखील सांगण्यात येत आहे.