अटलजींबद्दल बोलताना लालकृष्ण अडवाणी भावूक
माझी आणि अटलजींची मैत्री ६५ वर्षे राहिली यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली सभा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.
अटलजी देशवासियांसाठी जगले तसेच सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती असे यावेळी त्यांनी सांगितले. वाजपेयींचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक असून ते फक्त नावातच नाही व्यवहारातही 'अटल' होते असे ते म्हणाले.
आमची ६५ वर्षांची मैत्री- अडवाणी
माझी आणि अटलजींची मैत्री ६५ वर्षे राहिली यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आम्ही सिनेमा एकत्र पाहायचो, पुस्तकही एकत्र वाचायच असेही ते म्हणाले.
वाजपेयीजी स्वयंपाक खूप चांगल बनवायचे अशी आठवण ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी यावेळी सांगितली. वाजपेयींची पोकळी सहन होत नसल्याचे दु:खही त्यांनी यावेळी व्यक्त केले.